बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणारा शाहरुख खान हा सातत्याने चर्चेत आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता पठाणच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत. बुधवारी २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली.

कोणत्याही मुलाखतीशिवाय केवळ ट्रेलर, गाणी आणि थेट चाहत्यांशी संवाद यांच्या माध्यमातून शाहरुख आणि ‘पठाण’ची टीम या चित्रपटाचं प्रमोशन करत होती. चित्रपट हीट झाल्यावरसुद्धा नुकतंच शाहरुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘AskSRK’ हा हॅशटॅग पुन्हा वापरत त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. या ट्रेंडमधून शाहरुखने त्याच्या चाहत्यांना प्रश्न विचारायला सांगितले आहेत आणि त्यातील काही ठराविक लोकांच्या प्रश्नांना त्याने उत्तरं दिली.

आणखी वाचा : “फक्त सेक्स आणि शाहरुख खान…” २० वर्षांपूर्वी नेहा धुपियाने केलेलं वक्तव्य ‘पठाण’च्या निमित्ताने पुन्हा चर्चेत

अशाच एका ट्विटर युझरने शाहरुखला ‘पठाण’च्या प्रमोशनबाबतीत एक प्रश्न विचारला. तो युझर म्हणाला की. “कोणतंही प्रमोशन नाही, प्रदर्शनाआधी मुलाखत नाही, तरीही ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त डरकाळी फोडली आहे.” यावर शाहरुख खानने त्याच्या खास शैलीत त्याला उत्तर दिलं आहे. शाहरुख त्याला ट्वीट करत म्हणाला, “वाघ हा कधीच मुलाखती देत नाही, त्यामुळे मीसुद्धा यावेळी हाच विचार केला मी पण मुलाखती देणार नाही, बास जंगलात येऊन वाघाला बघावं लागेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुखच्या या उत्तराने कित्येकांची मनं जिंकली आहेत. चित्रपटातील शाहरुख आणि सलमानमधल्या त्या सीनची भरपूर चर्चा रंगत आहे. खूप वर्षांनी प्रेक्षकांना त्यांचे लाडके सुपरस्टार एकत्र मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहेत. २०० कोटी क्लबमध्ये शाहरुखच्या ‘पठाण’ने धमाकेदार एंट्री घेतलेली आहे. चाहत्यांना आणि चित्रपटप्रेमी लोकांना या चित्रपटाने थिएटरकडे खेचून आणलं आहे. शाहरुखचं हे कमबॅक अगदी धूमधडाक्यात साजरं करण्यात आलं आहे.