शाहरुख खानचा चाहतावर्ग जगभर पसरलेला आहे. किंग खान अशी ओळख असलेला हा अभिनेता त्याला पडलेल्या नावाप्रमाणेच सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. आता शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शाहरुखचे चाहते खूप आतुरतेने या चित्रपटाची वाट बघत आहेत. अशातच शाहरुखच्या एका जबरा फॅनने त्याच्यासाठी बुर्ज खलिफामधील अख्खं एक हॉटेलच बुक केलं.
शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. दुबईमध्ये या चित्रपटाच्या ट्रेलरचा एक ग्रँड लॉन्च सोहळा पार पडला. हा ट्रेलर बुर्ज खलिफावरही झळकवण्यात आला. या सोहळ्याला शाहरुख खान स्वतः हजर होता. त्यावेळी त्याने चाहत्यांशी संवाद साधला. या वेळेचे अनेक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आणखी वाचा : “…आणि हे मी यापुढे कधीच करणार नाही,” शाहरुख खानचं ‘जवान’ चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य
या कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालकाने त्याला सांगितलं की, एका चाहत्याने आणि त्याच्या कुटुंबाने त्याला भेटण्यासाठी बुर्ज खलिफामधील संपूर्ण रेस्टॉरंट बुक केलं आहे. त्यावर शाहरुख त्यांना हात दाखवत म्हणाला, “जेवण तयार ठेवा, मी तिथे येतोय. ओला टॉवेल सुद्धा तयार ठेवा करण मला आधी स्वतःला स्वच्छ करावं लागेल. या लाल जॅकेटमध्ये खूप गरम होत आहे.”
हेही वाचा : शाहरुख खानचा ‘कार’नामा! खरेदी केली नवी कोरी रोल्स रॉयस; किंमत वाचून व्हाल आवाक्
दरम्यान, त्याचा हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत दिसेल तर याचबरोबर दक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणचीदेखील या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. तर मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.