शाहरुख खानचं फॅन फॉलोइंग केवढं आहे हे आपल्याला ठाऊक आहेच. याबरोबरच शाहरुख खान हा त्यांच्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही हेदेखील आपल्याला ठाऊक आहे. आज जगभरात त्याचे लाखों चाहते आपल्याला पाहायला मिळतात. नुकतंच शाहरुखच्या एका वयोवृद्ध चाहतीने तिची शेवटची इच्छा व्यक्त केली. ‘पठाण’च्या या चाहतीने मरण्याआधी किंग खानला भेटायची इच्छा व्यक्त केली होती.

पश्चिम बंगालमधील ६० वर्षीय शिवानी चक्रवर्ती या शाहरुखच्या जबरदस्त फॅन आहेत. दुर्दैवाने सध्या त्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. या अवस्थेतही त्यांनी शाहरुख खानचा एकही चित्रपट चुकवलेला नाही. शिवाय त्यांनी शाहरुख आणि दीपिका या दोघांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायची इच्छा व्यक्त केली. हे समजताच शाहरुख खानने त्वरित त्या चाहतीशी संपर्क केल्याची बातमी समोर आली आहे.

आणखी वाचा : ६० वर्षीय शाहरुख खानच्या चाहतीने व्यक्त केली शेवटची इच्छा; म्हणाली “मृत्यूआधी मला… “

इंडिया टूडेच्या रिपोर्टनुसार शाहरुखने त्याच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून शिवानी यांच्याशी व्हिडीओ कॉलच्या मध्यमातू तब्बल ४० मिनिटं गप्पा मारल्या. इतकंच नव्हे तर लवकरात लवकर तिला भेटण्याचे आश्वासनही दिले. शिवानी यांची मुलगी प्रिया हिने दिलेल्या माहितीनुसार शाहरुख लवकरच तिच्या आईची भेट घेणार असून तिच्या उपचारासाठी आर्थिक मदतही करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रिया म्हणाली, “शाहरुख खान हा माझ्या आईच्या तब्येतीसाठी प्रार्थना करणार आहे. शाहरुखने वचन दिलं आहे की तो माझ्या लग्नात हजेरी लावणार आहे. तेव्हाच तो माझ्या आईच्या हातची फिश करीदेखील खाणार आहे.” शाहरुखच्या एका फॅनक्लबच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या व्हिडीओ कॉलबद्दल माहिती आणि फोटो शेअर करण्यात आले आहेत. सध्या शाहरुख खान ‘डंकी’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. शिवाय त्याचा ‘जवान’ हा चित्रपटही ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.