बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. शाहरुखच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. नुकतंच त्याच्या या चित्रपटातील एक गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यालाही सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. शाहरुख आणि दीपिका यांचा यातील हॉट अंदाज पाहून चाहते चांगलेच खुश झाले आहेत. सध्या शाहरुखचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या एका वाईट सवयीबद्दल खुलासा केला आहे.

‘झीरो’ चित्रपटादरम्यान ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या एका मुलाखतीमधील एक छोटीशी क्लिप सध्या व्हायरल होत आहे. ही तीच मुलाखत आहे ज्यामध्ये शाहरुखने देशातील असहिष्णुतेबद्दल वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. शाहरुखच्या चित्रपटावर बहिष्कार घालायची मागणी होत होती. एकूणच ही मुलाखत चांगलीच गाजली होती, याच मुलाखतीमध्ये शाहरुखने त्याच्या धूम्रपानाच्या सवयीबद्दल खुलासा केला आहे.

आणखी वाचा : सिद्धार्थ शुक्लाची ‘ही’ १० ट्वीट्स देतील तुमच्या भविष्याला वेगळी कलाटणी; जाणून घ्या

या मुलाखतीमध्ये शाहरुखला एका चाहत्याने त्याने केलेल्या प्रॉमिसची आठवण करून दिली आहे. तीच गोष्ट राजदीप यांनी या मुलाखतीमध्ये शाहरुखला विचारली. शाहरुखने ५० व्या वाढदिवासच्या आधी सिगारेट ओढणं बंद करणार असल्याचं वचन दिलं होतं आणि एका चाहत्याने याबद्दल शाहरुखला विचारलं असता त्याने यावर अत्यंत मजेशीर उत्तर दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुख म्हणाला, “५० व्या वर्षात पदार्पण केल्याने का कुणास ठाऊक मी बऱ्याच गोष्टी विसरायला लागलोय, त्यामुळे खरंच मला काही लक्षात नाही. मी दरवर्षी ठरवतो की धूम्रपाम सोडेन. ही खूप वाईट सवय आहे, तब्येतीसाठी हानिकारक आहे, यामुळे कर्करोग होतो. मी सांगू इच्छितो जर लोकांनी माझा तिरस्कार करावा यामागे केवळ एकच कारण आहे ते म्हणजे माझं सिगारेटचं व्यसन. मी खरंच मनापासून प्रयत्न करेन ही सवय लवकरात लवकर सोडायची. माझी मुलंसुद्धा मला याबद्दल सांगत असतात. मी लवकरच ही व्यसन सोडेन.” शाहरुख तब्बल ३ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुन्हा झळकणार आहे. त्याचा ‘पठाण’ २५ जानेवारी २०२३ या दिवशी प्रदर्शित होणार आहे.