बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘डंकी’ हा तिसरा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. ‘पठाण’ व ‘जवान’च्या यशानंतर प्रेक्षक आणि शाहरुखचे चाहते त्याच्या या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते. या चित्रपटाच्या माध्यमातून राजकुमार हिरानी व शाहरुख खान प्रथमच एकत्र आले आहेत. ‘डंकी’ला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचं त्याच्या कमाईवरुन स्पष्ट होत आहे.

‘जवान’ आणि ‘पठाण’सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देऊनही शाहरुखचा ‘डंकी’ पहिल्या दिवशी फक्त ३० कोटींचीच कमाई करू शकला. चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा झाली असली तरी शाहरुखच्या कामाचं प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. ‘जवान’प्रमाणेच यातही शाहरुखचा तरुणपणीचा आणि म्हातारपणाचा लुक आपल्याला पाहायला मिळत आहे. पण आता मात्र पुढील चित्रपटात नेमकी शाहरुख कशी भूमिका करणार हे स्पष्ट झालं आहे.

‘डंकी’नंतर शाहरुख नेमका कोणत्या चित्रपटात झळकणार याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान शाहरुखने त्याच्या पुढील चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे. पुढील चित्रपटातील भूमिका ही शाहरुखच्या वयाचीच असेल असाही खुलासा त्याने केला आहे. एका परदेशी चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहरुख म्हणाला, “मला वाटतं की पुढील वर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये माझ्या पुढील चित्रपटावर काम सुरू करेन. आता मी माझ्या वयाला साजेसे असे चित्रपट करणार आहे, खासकरून असे चित्रपट ज्यामध्ये मला माझं वय कमी दाखवावं लागणार नाही.”

आणखी वाचा : किंग खान व रणबीर कपूरला मागे टाकत प्रभासच्या ‘सालार’ने रचला नवा रेकॉर्ड; पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही ट्रेड एक्स्पर्टच्या अंदाजानुसार शाहरुखचा ‘डंकी’ बॉक्स ऑफिसवर फार कमाई करू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘जवान’ व ‘पठाण’च्या यशानंतर शाहरुखच्या आगामी चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या पण बऱ्याच लोकांच्या पदरी निराशा पडली आहे. राजकुमार हिरानी यांचा हा चित्रपट परदेशात अवैधरित्या जाणाऱ्या लोकांच्या संघर्षावर बेतलेला आहे. या चित्रपटात शाहरुखसह विकी कौशल, तापसी पन्नू, अनिल ग्रोव्हर, विक्रम कोचर, बोमन इराणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.