शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना यातील शाहरुख खानचे वेगवेगळे लूक्स पसंत पडले आहेत. आता या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने चांगली कमाई करायला सुरुवात केली आहे.

संपूर्ण इंडस्ट्रीतसुद्धा याच चित्रपटाची चर्चा आहे. ‘द काश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट देणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीसुद्धा शाहरुख खानच्या या ‘जवान’साठी उत्सुक आहेत. आता पाठोपाठ आणखी एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने ‘जवान’च्या ट्रेलरचे कौतुक केले आहे. खुद्द शाहरुख खाननेच याबद्दल खुलासा केला आहे.

आणखी वाचा : खिळवून ठेवणारा थरार अन् कंगना रणौतचं मोहक सौंदर्य; बहुचर्चित ‘चंद्रमुखी २’चा ट्रेलर प्रदर्शित

शाहरुखने नुकतंच ‘AskSRK’च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी एका चाहत्याने त्याला राजकुमार हिरानी यांच्या ‘जवान’चा ट्रेलर पाहिल्यानंतरच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले. या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुख म्हणाला, “राजू सरांना ट्रेलर प्रचंड आवडला. ट्रेलर पाहून मला पहिल्यांदा मेसेज करणारी व्यक्ती म्हणजे राजू सर. मी त्यांना चित्रपटातीलही काही भाग दाखवला आहे. त्यांनी कायमच आम्हाला सहकार्य केलं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जवान’ ७ सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर धडकणार आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपटाची २.७१ लाख तिकिटे विकली गेली आहेत. यातूनच चित्रपटाने ८.९८ कोटींची कमाई प्रदर्शनाच्या आधीच केली आहे. चित्रपटात शाहरुखसह नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदूकोण, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.