शाहरुख खानचा ‘जवान’ हा बहुचर्चित चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट अनेक रेकॉर्ड मोडत आहे. तर आता या चित्रपटाने प्रदर्शनाचे दहाव्या दिवशी किती कमाई केली याचा आकडा समोर आला आहे.

हा चित्रपट पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते खूप गर्दी करत आहेत. या चित्रपटातील ॲक्शन, कलाकारांची कामं, गाणी, कथा, संवाद या सर्वांनाच खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कमाईचा शंभर कोटींचा आकडा पार केला होता. तर दहाव्या दिवशीही या चित्रपटाने दणदणीत कमाई केली आहे.

आणखी वाचा : Jawan OTT release: किंग खानचा ‘जवान’ कधीपासून घरबसल्या पाहता येणार? घ्या जाणून

शुक्रवारपर्यंत या चित्रपटाने भारतातून ४०० हून अधिक कोटींचा गल्ला जमवला होता. सर्वात लवकर ४०० कोटींचा आकडा पार करणारा चित्रपट जवान ठरला आहे. तर आता मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाने शनिवारी ३१.५० कोटींची कमाई केली. तर आतापर्यंत या चित्रपटाने देशात ४४०.४८ कोटी आणि जगभरात ७३५.०२ कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा : “शाहरुख खान आणि ॲटली यांनी जबरदस्तीने…”, ‘जवान’मधील कलाकाराचा मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे आता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट प्रभासच्या ‘बाहुबली’चा रेकॉर्ड मोडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. सोशल मीडियावरून सर्वजण या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत.