शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचे गेले अनेक महिने सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. अखेर आज हा बहुप्रत्यक्षिक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर या चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळणारा प्रतिसाद बघता हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करेल याचा अंदाजे आकडा आता समोर आला आहे.

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाला भारतातून आणि भारताबाहेरून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याच्या चाहत्यांनी हा त्याचा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात अक्षरशः गर्दी केली आहे. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगमधूनच या चित्रपटाने बक्कळ पैसा कमावला. तर आता हा चित्रपट पहिल्या दिवशी किती गल्लाजमवेल याचा अंदाजे आकडा समोर आला आहे.

आणखी वाचा : खऱ्या आयुष्यात ‘असा’ आहे शाहरुख खान! गिरीजा ओकने केला खुलासा, म्हणाली, “त्याच्या स्वभावाबद्दल जे काही बोललं जातं ते सगळं…”

भारतात आणि भारताबाहेर या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद बघता हा चित्रपट पहिल्या दिवशी छप्पर फार कमाई करणार आहे. जगभरातून हा चित्रपट १०० हून अधिक कोटींची कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारतात हा चित्रपट ७५ कोटींच्या आसपास कमाई करेल तर जगभरातून हा चित्रपट पहिल्याच दिवशी १२० कोटींची कमाई करेल. त्यामुळे आता हा चित्रपट किती कमाई करतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा : Video: “मला खरंच…” भर कार्यक्रमात शाहरुख खानने केलं मराठमोळ्या गिरीजा ओकचं कौतुक, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या चित्रपटात शाहरुख खान बरोबर अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत दिसत आहे. तर दक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिका साकारत आहे. दीपिका पादुकोण या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकत असून मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओकही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.