‘पठाण’ला दिलेल्या तुफान प्रतिसदानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. त्याच्या येणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे चित्रपट आहेत. शाहरुखने ‘जवान’ची घोषणा करताच सर्वांचे लक्ष या चित्रपटाकडे लागले. यातील त्याच्या फर्स्ट लूकचीही प्रेक्षकांनी प्रशंसा केली. आता याच ‘जवान’ चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

‘जवान’ हा चित्रपट शाहरुख खानचा या वर्षातील दुसरा बिग बजेट चित्रपट आहे. साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एटली या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करत हा चित्रपट २०२३च्या जून महिन्यात प्रदर्शित होणार अशी अधिकृत घोषणा करण्यात आली होती. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय या चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.

Amitabh Bachchan look in Kalki 2898 AD
‘शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे!’ Kalki 2898 AD चा टीझर प्रदर्शित; ‘अश्वत्थामा’च्या दमदार भूमिकेत आहेत अमिताभ बच्चन
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

आणखी वाचा : भव्य खोल्या, प्रायव्हेट मूव्ही थिएटर आणि…; ‘इतक्या’ कोटींचा आहे शाहरुख खानचा आलिशान मन्नत बंगला

चित्रपट विश्लेषक रमेश बाला यांनी ट्वीट करत ‘जवान’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं आहे. “एटली दिग्दर्शित शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट आता जूनमध्ये रिलीज होणार होता. पण आता हा चित्रपट ऑक्टोबर २०२३मध्ये रिलीज होणार आहे,” असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहीलं. पण अद्याप या वृत्ताला शाहरुख खान किंवा एटलीने कोणताही दुजोरा दिलेला नाही.

हेही वाचा : शाहरुख खानच्या ‘जवान’ने रचला नवा विक्रम, प्रदर्शनाआधीच चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी

शाहरुख खानबरोबरच या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता विजय सेतुपतीदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे खरोखरच हा चित्रपट जूनच्याऐवजी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार का हे या चित्रपटाची टीम लवकरच स्पष्ट करेल.