बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान एकापाठोपाठ एक ब्लॉकबस्टर चित्रपट देत आहे. ७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ चित्रपटाने बरेच रेकॉर्ड मोडून बक्कळ कमाई केली आहे. जागतिक स्तरावर १००० कोटींहून तर देशांर्गत ५०० कोटींहून अधिक गल्ला ‘जवान’ चित्रपटाने जमावला आहे. यापूर्वी शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट गाजला होता. या चित्रपटाने देखील रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होता. त्यानंतर आता किंग खानचा ‘डंकी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण अशातच राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपट हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असल्याची चर्चा सुरू झाला.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने नाश्ताला उपमा, पोहे नाही तर खाल्ला ‘हा’ पदार्थ, फोटो शेअर करत म्हणाली…

शाहरुखचा आगामी चित्रपट ‘डंकी’ हा मल्याळम चित्रपटाचा रिमेक असल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू आहे. बॉक्स ऑफिस इंडियाने ट्वीट केलं आहे की, “आगामी बिग बजेट असलेला शाहरुखचा ‘डंकी’ चित्रपट, ज्याचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करत आहेत. तो चित्रपट दुलकर सलमानचा ब्लॉकबस्टर ‘कॉमरेड इन अमेरिका’ (CIA)चा अनऑफिशअल रिमेक आहे.”

हेही वाचा – “…असं कोण करत?”; गिरीजा ओकने सांगितला शाहरुख खानचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “अ‍ॅटलीच्या वाढदिवसाला त्याने…”

हेही वाचा – पक्षविरोधी कारवायांमुळे अर्चना गौतमीची तीन महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून झाली होती हकालपट्टी

तसेच दुसऱ्या नेटकऱ्यानं ट्वीटवर लिहीलं आहे की, “मला एका टीम मेंबरकडून कळालं की, ‘डंकी’ चित्रपट खरंच मल्याळम ‘CIA’चा स्वस्त रिमेक आहे. पण चित्रपटाचे राइट्स खरेदी करून रिमेक करायला पाहिजे होता. अशा चीप ट्रिक्स शाहरुख खान नको करू.” पण अजूनही ‘डंकी’ हा ‘CIA’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक असल्याची अधिकृत घोषणा झालेल नाही. परंतु ट्वीटरवर हॅशटॅग #Dunki ट्रेंड होऊ लागलं असून नेटकरी नाराजी व्यक्त करत आहे.

हेही वाचा – शाहरुख खानच्या ‘जवान’ने अखेर ‘पठाण’चा मोडला वर्ल्डवाइड रेकॉर्ड; देशांतर्गत २४व्या दिवशी केली जबरदस्त कमाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘डंकी’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर खरंच तो ‘CIA’चा रिमेक आहे का? हे स्पष्ट होईल. २२ डिसेंबरला ‘डंकी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी प्रभासचा ‘सालार’ चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.