Shamita Shetty Talks About Sister Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी बॉलीवूडमधील ९०च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. तिच्या पाठोपाठ तिची बहीण शमिता शेट्टीनेही अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेलं परंतु, तिला बहिणी इतकी लोकप्रियता मिळाली नाही. यामुळे अनेकदा दोघींमध्ये तुलना केली जाते अशातच आता शमिता शेट्टीने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

शमिता शेट्टीने शिल्पा शेट्टीबरोबर होणाऱ्या तुलनेबद्दल आणि बहिणीबरोबरच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. करिअर, लोकप्रियता यामुळे अनेकदा दोघींमध्ये तुलना केली जाते. अशातच आता शमिताने नुकतच ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखत याबद्दल सांगितलं आहे.

शमिताला ती बहिणीबरोबर तुलना होणं अशा गोष्टींना कशी सामोरी जाते याबद्दल विचारण्यात आलेलं. यावर ती म्हणाली, “आता असं काही होत नाही. पण माझ्यासाठी खूप कठीण होतं हे सगळं. मला नेमकं काय करायचं आहे काय आवडतं हे समजण्याचा प्रवास खूप कठीण होता. अनेकदा मला एखादी गोष्ट माझ्यासाठी नाहीये असं वाटायचं त्यामुळे मला नेमकं काय करायचं आहे याबद्दल माझ्यामनात खूप गोंधळ असायचा. “

अभिनेत्री पुढे म्हणाली, लहान असताना अनेकदा तिच्याबरोबर असं व्हायचं. पण आता तिला या गोष्टी फार वेगळ्या वाटताता आणि ती आता खूप पुढे आली आहे. तिच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. काय हवं आहे याबद्दल तिला स्पष्टता आहे त्यामुळे आता तुलना झाली तरी तिला फरक पडत नाही.

शिल्पा शेट्टीबरोबरच्या नात्याबद्दल शमिता शेट्टीची प्रतिक्रिया

शमिता शेट्टीने सांगितलं की लहान असताना ती हे सगळं कोणालाही सांगायची नाही पण अभिनेत्री झाल्यानंतर जेव्हा तिला तिच्या बहिणीबरोबर होणाऱ्या तुलनेबद्दल विचारलं जाऊ लागलं तेव्हा “दोन वेगळ्या व्यक्तींची तुलना करणाऱ्यांकडे ती फार लक्ष देत नाही. असं तिचं मत ती व्यक्त करायची. पुढे अभिनेत्री म्हणाली, “प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. हे फक्त दोन बहिणींपुरतं मर्यादित नाहीये. एकाच घरात जन्माला आलेली दोन माणसं एकमेकांपेक्षा खूप वेगळी असू शकतात आणि शिल्पा खूप वेगळी आहे आणि मीसुद्धा वेगळी आहे. आम्ही खूप वेगळ्या आहोत”.

शिल्पा शेट्टी व शमिता शेट्टी यांनी नुकतीच रक्षाबंधननिमित्त कपिल शर्माच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी एकमेकींबरोबरच्या नात्याबद्दल सांगितलं. त्या दोघींमध्ये एकमेकींसाठी खूप प्रेम असल्याचं त्यामधून पाहायला मिळालं