बॉलिवूडचा संजू बाबा अर्थात अभिनेता संजय दत्त चर्चेत असतो. नुकताच तो ‘शमशेरा’ चित्रपटात दिसला होता. गेली अनेकवर्ष तो बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. सकारात्मक भूमिका असो किंवा नकारात्मक कोणतीही भूमिका तो उत्तमरीत्या पडद्यावर साकारतो. त्याने आजवर अनेक भूमिका साकारल्या मात्र त्याची लक्षात राहणारी भूमिका म्हणजे ‘मुन्नाभाई’, या भूमिकेने त्याला नवी ओळख दिली. ‘मुन्नाभाई एबीबीएस’ हा चित्रपट आजही प्रेक्षक आवर्जून बघतात. याच चित्रपटाचा पुढील भागदेखील प्रदर्शित झाला होता. पहिल्या भागात डॉक्टर बनणारा मुन्नाभाई दुसऱ्या भागात गांधीजींच्या विचारसरणीवर चालतो.
‘लगे राहो मुंन्नाभाई’ या चित्रपटात मुन्नाभाई या पात्राला महात्मा गांधी दिसत असतात. ते त्याला आपल्या विचारातून समस्येचे निवारण करण्यास सांगत असतात. या चित्रपटातील एक सीन अभिनेता संजय दत्तने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात सुरक्षारक्षक मुन्नाच्या कानशिलात लगवतो, त्यावर मुन्नादेखील त्याला त्याच्या पद्धतीत उत्तर देतो. या व्हिडीओला happy gandhi jayanti to all असा कॅप्शन दिला आहे.
लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केली ‘मोठी’ घोषणा
‘लगे राहो मुंन्नाभाई’ या चित्रपटात संजय दत्त बरोबर मराठमोळे अभिनेते दिलीप प्रभावळकरदेखील होते. दिलीप प्रभावळकर यांनी गांधींची भूमिका केली होती. या चित्रपटात मुन्ना गांधीगिरी करताना दिसला आहे. विद्याबालन , बोमन इराणी, वर्षाव वारसी हे अभिनेतेदेखील प्रमुख भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेले गांधी प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले होते.
मुन्नाभाई या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच येणार अशी चर्चा आहे. मात्र दिग्दर्शकांनी अद्याप कोणती घोषणा केली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजू हिरानी यांनी संजय दत्तबरोबर दोन चित्रपट केले. त्यानंतर राजू यांनी संजय दत्तच्या जीवनावर आधारित एक चित्रपट काढला होता. ज्यात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली होती.