मराठमोळ्या अंदाजाने बॉलिवूडमध्ये नाव कमावणारा अभिनेता शरद केळकर सध्या चर्चेत आहे. शरदचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून सोशल मीडियावरुन तो त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. आगामी प्रोजेक्ट्स, कामाबाबतची माहिती शरद सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.

शरद अनेकदा कुटुंबियांबरोबरचे फोटोही शेअर करत असतो. नुकतंच शरदने पत्नी किर्तीबरोबरचा एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. माने मेरी जान या गाण्यावरील शरद व किर्तीच्या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शरद व किर्तीचं एकमेकांवर किती प्रेम आहे, हे या व्हिडीओतून दिसत आहे. व्हिडीओमध्ये किर्तीने प्रेमाने शरदला किस केल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

हेही वाचा>>“देवेंद्रजी, बायकोला मराठी बोलायला…”, मकर संक्रांतीच्या शुभेच्छांवरून अमृता फडणवीस ट्रोल

हेही वाचा>>१० वर्षांपूर्वी नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात प्रसिद्ध बालकलाकाराने गमावलेला जीव; वडील दुर्घटनेबाबत भावूक होत म्हणाले…

शरद व किर्तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत या जोडीप्रती असलेलं त्यांचं प्रेम व्यक्त केलं आहे. “तुम्हाला कोणाची नजर लागायला नको”, अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर दुसऱ्याने “तुमची जोडी क्यूट आहे”, असं म्हटलं आहे. “किती छान कपल आहे”, अशी कमेंटही एका चाहत्याने केली आहे.

हेही वाचा>> वनिता खरात व रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद केळकर व किर्ती ३ जून २००५ रोजी विवाहबंधनात अडकले. त्यांना केशा ही मुलगी आहे. शरदने अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘तान्हाजी’ चित्रपटात त्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली होती.