एकेकाळी अभिनेत्री रीना रॉय आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या अफेअरची खूप चर्चा झाली होती. त्या काळात सेलिब्रिटी आपले नाती लपवत असत. पण शत्रुघ्न सिन्हा या बाबतीत थोडे वेगळे होते. त्यावेळी शत्रुघ्न हे एकमेव सेलिब्रिटी होते ज्यांनी रीना रॉयसोबतचं नातं कधीही लपवलं नाही. दोघांच नातं जवळपास सात वर्षे टिकलं. तेव्हा शत्रुघ्न सिन्हा रीना रॉयशी लग्न करतील, असं वाटत होते. पण तसं झालं नाही आणि त्यांनी पूनम सिन्हाशी लग्न केलं होतं.

सोनाक्षी सिन्हा हुबेहुब तुमच्यासारखी का दिसते? यावर रीना रॉय यांनी सोडलं मौन, म्हणाल्या…

शत्रुघ्न यांनी रीना रॉयला सोडून पूनमशी लग्न का केलं होतं? या प्रश्नाचं उत्तर खुद्द शत्रुघ्न यांनीच एका मुलाखतीत दिलं होतं. रीना रॉयसोबतच्या नात्यावर उत्तर देत ते म्हणाले होते, ‘माझं नातं वैयक्तिक होतं.’ एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी रीनाबरोबरच्या नातेसंबंधाची कबुली दिली होती, “रीनाबरोबरचं माझं नातं वैयक्तिक होतं. लोक म्हणतात की पूनमशी लग्न केल्यानंतर रीनासाठी माझं मन बदललं. पण तसं नाही, उलट या भावना आणखी वाढल्या. मी भाग्यवान आहे की तिने मला तिच्या आयुष्यातील साते वर्षे दिली.”

लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यांनी रेखाच्याच ओढणीने पतीने घेतला होता गळफास, सुसाईड नोटमध्ये अभिनेत्रीचा उल्लेख करत लिहिलं होतं…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शत्रुघ्न सिन्हा यांनी रीनाशी लग्न केलं असतं तर पूनम नात तोडायला तयार होत्या. पण तरीही शत्रुघ्न सिन्हा यांनी तसं केलं नाही. त्याचं कारण सांगते ते म्हणाले होते, “लग्न हा कोणत्याही समस्येवर किंवा अडचणीवरचा उपाय असू शकत नाही. वस्तुस्थिती अशी आहे माझे नाते वैयक्तिक होते… रीना रॉयसोबतच्या अफेअरवर शत्रुघ्न सिन्हा यांनी दिले असे उत्तर, त्यांनी स्वतः सांगितले लग्न का नाही?की विवाहामुळे अधिक अडचणी निर्माण होतात. मी रीनाला जाहीरपणे भेटलो होतो. आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. ‘माटी मांगे खून’, ‘काली बस्ती’ आणि ‘धर्म शत्रू’ असे चित्रपट आम्ही सोबत केलं होतं. माध्यमांमध्ये इतक्या वर्षांनीही आमच्याबद्दल बरंच लिहिलं जातं.”