‘काटा लगा’ फेम शेफाली जरीवाला सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. शेफाली तिचा पती पराग त्यागीबरोबरचे अनेक रोमँटिक फोटो व व्हिडिओ शेअर करताना दिसते. नुकताच शेफालीने तिचा ४०वा वाढदिवस दणक्यात साजरा केला. परागने त्याच्या हातावर शेफालीच्या नावाचा टॅटू काढत तिला सरप्राईज दिलं. आता शेफालीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – “आयुष्य बदललं कारण…” लग्नानंतर राणादा कसं जीवन जगतो? घरातून बाहेर पडताना बायकोला व्हिडीओ कॉल केला अन्…

शेफालीने तिचा ४०वा वाढदिवस परागसह साजरा केला. वाढदिवसानिमित्त दोघं एका पार्टीसाठी गेले होते. या पार्टीमध्ये शेफाली व परागचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. पार्टीमध्ये राऊंड ट्रॉलीवर दोघं रोमान्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

राऊंड ट्रॉलीवर शेफाली व पराग लिपलॉक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर दोघं एकमेकांच्या अधिक जवळ आले असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. शेफालीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – “एक चट्टान, सौ शैतान…” कपाळी भस्म अन् भेदक नजर, अजय देवगणचा ‘भोला’मधील अंगावर काटा आणणार लूक, पाहा व्हिडीओ

याआधीही शेफालीने परागबरोबर अनेक रोमँटिक व्हिडीओ व फोटो शेअर केले. अनेकांनी शेफालीला अशाप्रकारचे व्हिडीओ पोस्ट न करण्याचा सल्ला दिला आहे. शेफालीच्या या व्हिडीओला ८५ हजारांपेक्षा अधिक लाइक मिळाले आहेत.