बिग बॉस फेम शहनाझ गिल नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. सध्या तिचा नवा शो ‘देसी वाइब्स विद शहनाज गिल’ बराच गाजतोय. सोशल मीडियावर त्याची बरीच चर्चा होताना दिसत आहे. शहनाझच्या या शोमध्ये आतापर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. या शोमध्ये शहनाझ कलाकारांना त्याच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल प्रश्न विचारताना दिसते. अशातच आता शहनाझचा असा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ती खूपच चिडलेली दिसत आहे. शहनाझचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरलही झाला आहे.

प्रसिद्ध फोटो आणि व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शहनाझचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शहनाझ मीडियाशी बोलताना दिसत आहे. यावेळी बराच गोंगाटही ऐकू येत आहे. एका व्यक्तीशी बोलत असताना दुसरा एक व्यक्ती पुन्हा- पुन्हा शहनाझचं नाव घेत असलेलं ऐकू येत आहे. ज्यामुळे शहनाझला राग अनावर झाला आणि तिने पापाराझींना चांगलंच सुनावलं. शहनाझचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती मध्ये मध्ये बोलणाऱ्या त्या व्यक्तीला सांगताना दिसतेय की, “हा अपमान आहे. आता आम्ही बोलत आहोत तर तुम्ही ते ऐकलं पाहिजे. त्याला सांगा तू गप्प बस.”

आणखी वाचा- शहनाझ गिल पुन्हा प्रेमात? ‘या’ अभिनेत्याशी जोडलं जातंय नाव

शहनाझच्या या व्हिडीओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी शहनाझच्या बोलण्याला पाठिंबा दिला आहे तर काहींना मात्र तिचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही. एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, “शहनाझचं बोलणं बरोबर आहे. जर एखादी व्यक्ती बोलत असेल तर इतरांनी ती व्यक्ती काय बोलत आहे हे ऐकायला हवं.” तर दुसऱ्या युजरने लिहिलं, “शहनाझच्या मनात जे असतं तेच तिच्या वागण्या- बोलण्यातही असतं. त्यामुळेच ते एवढी उत्तम कलाकार आहे.” याशिवाय आणखी एका युजरने शहनाझचं कौतुक करत, ‘तिने अगदी योग्य तेच सांगितलं’ असं म्हटलं आहे.

आणखी वाचा- Makar Sankranti 2023: महेश बाबूच्या लेकीने मराठीतून दिल्या शुभेच्छा, नम्रता शिरोडकरने शेअर केला खास Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शहनाझ गिलच्या कामाबद्दल बोलायचं तर ती टीव्ही जगतातील यशस्वी करिअरनंतर आता बॉलिवूडमध्ये अभिनय करताना दिसणार आहे. काही रिपोर्ट्सच्या माहितीनुसार शहनाझ गिल लवकरच सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसणार आहे.