अभिनेत्री शहनाझ गिल मागच्या काही दिवसांपासून ‘देसी वाइब्स विथ शहनाझ गिल’ या तिच्या शोमुळे चर्चेत आहे. तिच्या या शोमध्ये आतापर्यंत शाहिद कपूरपासून ते विकी कौशल आणि आयुष्मान खुराना यांनी हजेरी लावली आहे. अलिकडेच या शोमध्ये भुवन बामने हजेरी लावली होती. यावेळी शहनाझने भुवनबरोबर त्याच्या खासगी आणि व्यावसायित आयुष्याबद्दल मजेदार प्रश्न विचारले. याशिवाय लग्न आणि भविष्यातील प्लानबद्दल गप्पा मारल्या. यावेळी शहनाझने तिच्या खासगी आयुष्याबद्दलही काही खुलासे केले.

शहनाझ गिल दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या प्रेमात होती. दोघांची पहिली भेट आणि मैत्री बिग बॉस १३ मध्ये झाली होती. या शोमध्येही शहनाझने अनेकदा सिद्धार्थ आपल्याला आवडत असल्याचं आणि त्याच्याबरोबर लग्न करण्याची इच्छा असल्याचं कबुल केलं होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. सिद्धार्थ शुक्लाचं २ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झालं. त्यानंतर शहनाझ खूपच खचली होती आणि तिने लोकांमध्ये मिसळणं, बोलणं बंद केलं होतं. पण नंतर ती या सगळ्यातून बाहेर पडली आणि आता ती स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे.

आणखी वाचा- शाहरुख खानला चाहत्याने दिली FIR दाखल करण्याची धमकी; अभिनेता म्हणाला, “कृपया असं काही…”

शहनाझ गिलने स्वतःचं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे आणि त्यावर तिचा ‘देसी वाइब्स विथ शहनाझ गिल’ शो प्रसारित होतो. या शोमध्ये पहिल्यांदाच शहनाझने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं. ती म्हणाली, “आयुष्यात तुम्हाला माहीत नसतं की तुमच्या भविष्यात काय आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहावं लागतं. आता माझ्याकडे काही गोष्टी आहेत करण्यासारख्या तर मी करत आहे. पुढे जाऊन मी काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. प्रयत्न करत राहीन की मला काम मिळत राहिल. पण जर मला काम मिळालं नाही तर माझ्याकडे एवढी सेव्हिंग असायला हवी की भविष्यात पैशासाठी मला कोणाकडे हात पसरावे लागू नयेत.”

आणखी वाचा- इस्लामसाठी आणखी एका अभिनेत्रीचा ११ वर्षांनंतर अभिनय क्षेत्राला रामराम, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहनाझ पुढे म्हणाली, “या सगळ्यात मला लग्न करायला नाही मिळालं तरीही हरकत नाही. मला आता लग्न वैगरे या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये. मला माझ्या आयुष्यात खूप पुढे जायचं आहे. पण माझं मत आहे की मी माझी बचत ठेवू. मला माझे पैसे उडवायला आवडत नाही. मला सेव्हिंग करायची आहे.” दरम्यान शहनाझने अलिकडेच स्वतःचं घर खरेदी केलं आहे.