शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ या चित्रपटावरून सध्या जोरदार वाद सुरू आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याचं चित्रण प्रेक्षकांना आवडलेलं नाही. दीपिकाने या गाण्यामध्ये घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका शिल्पा राव हिने हे गाणं गायलं आहे. पण आता अशातच तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

एकीकडे ‘पठाण’च्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून वाद सुरू असतानाच, दुसरीकडे अनेकजण शिल्पा राव हिने उत्तमप्रकारे गायल्याबद्दल तिचं कौतुक करत आहे. या गाण्यामुळे सध्या तीही खूप चर्चेत आली आहे. पण आता हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यावेळी ती हे गाणंच विसरल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा : “… म्हणून ‘पठाण’ हा चित्रपट तुम्ही पहायलाच हवा…” शाहरुख खानने उघड केलं कारण

शिल्पा नुकतीच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. ह्या कार्यक्रमात मीडिया रिपोर्टर्सशी बोलताना त्यांनी तिला हे गाणं गाण्याची त्यांनी विनंती केली. ती विनंती शिल्पाने अगदी आत्मविश्वासाने आणि हसत हसत मान्य केली. परंतु गाणं गाण्याच्या आधी ती त्या गाण्याची पहिली ओळच विसरली. काही सेकंद विचार करूनही तिला त्या गाण्याची ओळ काही आठवली नाही. नंतर तिने तिथे उपस्थित असलेल्यांना गाण्याची पहिली ओळ सांगण्याची विनंती केली. नंतर एकाने गाण्याची पहिली ओळ तिला सांगितल्यावर मग तिने बाकीचं गाणं गायलं.

तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसंच या विसरण्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावरही आली आहे. “या गाण्यामुळे प्रचंड वाद उफाळून आल्याने तू हे गाणं विसरलीस का?” अशा आशयाच्या कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत.

हेही वाचा : “माफी मागणं हे दरवेळी उत्तर नसू शकतं, पण…” ‘पठाण’च्या वादात शाहरुख खानच्या नव्या ट्वीटने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान पठाणच्या या गाण्यावरून वाद सुरू असताना लवकरच या चित्रपटातील दुसरं गाणंही प्रदर्शित होणार आहे. ‘झुमे जो पठाण’ असं या गाण्याचं नाव आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्याप्रमाणेच या ‘झुमे जो पठाण’ नवीन येणाऱ्या गाण्यातही दीपिका आणि शाहरुखची हॉट केमिस्ट्री दिसून येणार आहे. हे गाणं उद्या प्रदर्शित होईल.