Shilpa Shetty Reacted On Marathi-Hindi Language Row : शिल्पा शेट्टी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासह ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. त्यामार्फत ती अनेकदा तिचे फिटनेसचे व्हिडीओ, फोटोशूट व रेसिपी शेअर करीत असते. अशातच आता सध्या ती चर्चेत आहे ते तिच्या आगामी चित्रपटामुळे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी लवकरच तिच्या ‘केडी’ या नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये तिच्यासह अभिनेता संजय दत्त, विजय सेतुपती, नोरा फतेही यांसारखे प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. ‘केडी’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त नुकतीच शिल्पा शेट्टी व संजय दत्त यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यादरम्यानच अभिनेत्रीने मराठीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

‘फ्री प्रेस जनरल’च्या वृत्तानुसार ‘केडी’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान शिल्पा शेट्टीला मराठी-हिंदी वादाबद्दल विचारण्यात आले होते. शिल्पा शेट्टी त्यावर म्हणाली, “याबद्दल संजय दत्त त्यांची प्रतिक्रिया देतील”. नंतर ती म्हणाली, “मला मराठी माहीत आहे. मी महाराष्ट्राची मुलगी आहे; पण आज आपण ‘केडी’ या चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी जमलो आहोत. त्यामुळे कुठल्याही वादग्रस्त विषयावर आम्ही बोलणार नाही”.

शिल्पा शेट्टी पुढे तिच्या चित्रपटाबद्दल म्हणाली की, “आमचा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आम्ही तो मराठीतही प्रदर्शित करू शकतो”. त्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवत तिचे कौतुक केले. यावेळी संजय दत्तसुद्धा तिथे उपस्थित होते.

‘केडी’ या चित्रपटाद्वारे शिल्पा शेट्टी कन्नड चित्रपटसृष्टीत तब्बल २० वर्षांनी पुनरागमन करणार आहे. तर हा चित्रपट बंगळुरूमधील एका सत्य घटनेवर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. दिग्दर्शक प्रेम यांनी ‘केडी’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिल्पा शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ‘केडी’ चित्रपटापूर्वी ती नुकतीच ‘सुखी’, ‘निक्कमा’, ‘हंगामा २ ‘यांसारख्या चित्रपटांतून झळकली होती. शिल्पा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने ९० च्या काळात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.