Shilpa Shirodkar on Madhuri Dixit: ‘हम’, ‘खुदा गवाह’, ‘बेवफा सनम’, ‘आँखे’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ओळखली जाते. ९० च्या दशकात अभिनेत्रीची मोठी लोकप्रियता होती.
यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आणि लग्न करून ती परदेशात वास्तव्यास गेली. त्यानंतर गेल्या वर्षी अभिनेत्री ‘बिग बॉस १८’मध्ये सहभागी झाली होती. आता अभिनेत्री लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. जटाधरा असे या सिनेमाचे नाव आहे.
माधुरी दीक्षितबाबत शिल्पा शिरोडकर काय म्हणाली?
आता अभिनेत्री तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तिने नुकतीच एनडीटीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने इंडस्ट्रीमधील तिचे जवळचे सहकलाकार कोण आहेत, तसेच आताच्या पिढीतील आवडते कलाकार कोण, याबाबत वक्तव्य केले.
शिल्पा शिरोडकरने नुकतीच एनडीटीव्हीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत अभिनेत्रीला विचारण्यात आले की, आधी जेव्हा ती बॉलीवूडमध्ये काम करीत होती, त्यावेळी कोणत्या कलाकारांबरोबर तिची चांगली मैत्री होती. त्यावर अभिनेत्री म्हणाली, “माझं माधुरीबरोबर खूप चांगलं नातं होतं.”
ती आताही माधुरीच्या संपर्कात आहे का? यावर शिल्पा शिरोडकर म्हणाली, “दुर्दैवानं आम्ही सध्या संपर्कात नाही. जेव्हा ती भारतात परत आली तेव्हा मी दोन वर्षं भारतात होते. त्यानंतर माझं लग्न झालं आणि मी परदेशात राहण्यासाठी गेले. मग ती तिच्या कामात व्यग्र झाली. आता मी भारतात परत आली आहे; पण मला तिच्याबरोबर पुन्हा काम करण्याची अजून संधी मिळालेली नाही.”
“मला खात्री आहे की, तिला माहीत असेल की, मी भारतात परतली आहे. ती माझ्यासाठी नक्कीच आनंदी असेल, जशी ती पूर्वीदेखील माझ्यासाठी आनंदी असायची. ती अशी एक व्यक्ती आहे, जिच्याबरोबर माझे खूप चांगले संबंध होते.” माधुरी दीक्षित आणि शिल्पा शिरोडकर यांनी मृत्युदंड, किशन कन्हैया, या चित्रपटांत एकत्र काम केले आहे.
आताच्या पिढीतील कलाकारांबद्दल शिल्पा शिरोडकर म्हणाली, “मी आलिया भट्टची खूप मोठी चाहती आहे. मला वाटते की, ती या पिढीतील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक आहे. त्यानंतर कियारा अडवाणी आहे. मला जान्हवी कपूर, सुहाना खानही खूप आवडतात.