सध्या बॉलिवूडमधील देओल कुटुंब हे चांगलंच चर्चेत आहे. आता मात्र या परिवारावर शोककळा पसरली आहे. अभिनेता बॉबी देओलच्या सासूबाई मर्लिन आहूजा यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामुळे संपूर्ण देओल परिवारावर शोककळा पसरली आहे. मर्लिन गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या अन् रविवारी त्यांचे निधन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

बॉबी देओलने ३० मे १९९६ रोजी तान्या आहुजाशी लग्नगाठ बांधली. तान्याच्या आईला गंभीर आजार असल्याचं सांगितलं जात आहे. तान्याशिवाय मर्लिन आहूजा यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मर्लिन आहूजा ह्या मुंबईमध्येच रहात होत्या.

आणखी वाचा : “मला ५० इतर मॉडेल्ससमोर…” मॉडेलिंग करताना आलेल्या ‘त्या’ अनुभवाबद्दल क्रिती सेनॉनने केला खुलासा

शनिवारी देओल कुटुंबाने सनी देओलच्या ‘गदर २’ या चित्रपटाची सक्सेस पार्टी ठेवली होती. तमाम बॉलिवूड स्टार्स या पार्टीत हजर होते. आजारपणामुळे बॉबी देओलच्या सासू या इवेंटला हजर राहू शकल्या नव्हत्या. मर्लिन आहूजा या एका प्रतिष्ठित घराण्यातील होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मर्लिन यांचे पती देवेंद्र आहुजा हे एक प्रतिष्ठित बँकर होते. मर्लिन आहूजा स्वतः एक यशस्वी उद्योजिका होत्या. हेच बाळकडू त्यांनी त्यांच्या मुलांना दिले अन् बॉबीच्या पत्नीलाही व्यवसायात रुची निर्माण झाली. तान्या ही इंटिरियर डिजायनर आहे. याबरोबरच तिचा एक फर्निचर ब्रँडही आहे. बॉबीच्या सासूबाईंच्या निधनाने देओल परिवार शोकाकुल झाला आहे.