अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आतापर्यंत तिने तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या निरागसपणाने आणि नम्रपणानेदेखील सर्वांचं मन जिंकलं आहे. ती अमराठी असली तरीही तिला मराठमोळी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आतापर्यंत अनेक कार्यक्रम सोहळ्यांमध्ये ती चांगलं मराठी बोलताना दिसून आली आहे. आता तिने मीडिया फोटोग्राफर्सशी अत्यंत आपुलकीने मराठीमध्ये संवाद साधला.

श्रद्धा कपूरला मराठी संस्कृतीबद्दल, मराठी भाषेबद्दल नेहमीच गोडी वाटत आली आहे. बोलणं असो, वेशभूषा असो अथवा खाद्यपदार्थ; अनेकदा ती तिच्या कृतीतून तिला मराठी संस्कृतीबद्दल वाटणारं प्रेम दाखवत असते. आतापर्यंत अनेकदा तिच्या मराठी बोलण्याचं कौतुक केलं गेलं आहे. तर आता तिचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अत्यंत आपलेपणाने अस्खलित मराठी बोलत फोटोग्राफर्सशी संवाद साधत आहे.

आणखी वाचा : पुण्याला पोहोचताच श्रद्धा कपूरने घेतला अस्सल पुणेरी मिसळ व वडापावचा आस्वाद, म्हणाली…

श्रद्धाला नुकतंच मुंबईमध्ये पाहण्यात आलं. या वेळी ती गाडीतून उतरून एके ठिकाणी जाताना दिसली. श्रद्धा कपूरला बघताच मीडिया फोटोग्राफर्सनी तिला फोटोसाठी पोज देण्याची विनंती केली. श्रद्धा आणि फोटोग्राफर्समधील संभाषण मराठीत सुरू झालं. त्यावर धन्यवाद म्हणून आपुलकीने श्रद्धाने त्यांची विचारपूस केली. तिने विचारलं, “तुम्ही सगळे कसे आहात?” त्यावर फोटोग्राफर्स म्हणाले, “आम्ही छान आहोत. तुम्ही कशा आहात?” त्यावर श्रद्धा म्हणाली, “मी मस्त.”

हेही वाचा : श्रद्धा कपूरने सांगितलं उत्तम मराठी बोलता येण्यामागचं गुपित, म्हणाली, “कारण मी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वेळी श्रद्धाचा लूक बदललेला दिसला. आता तिने हेअर स्टाइल बदलली असून केस कापले आहेत. तिच्या हा बदललेला लूक पाहून फोटोग्राफर्सने तिला हा लूक आवडल्याचं सांगितलं. त्यावर श्रद्धा उत्तर देत म्हणाली, “थँक यू. आता उकाडा पण वाढला आहे ना.. म्हणून मी केस कापले.” आता तिचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला असून तिचा नम्रपणा पाहून नेटकरी भारावून गेले आहेत. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी श्रद्धाच्या या स्वभावाचं आणि या मराठमोळ्या अंदाजाचं कौतुक करत आहेत.