‘मिर्झापूर’ वेबसीरिजमुळे अभिनेत्री श्रिया पिळगावकर घराघरांत लोकप्रिय झाली. बॉलीवूडमध्ये तिने अल्पावधीतच स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रिया ही दिग्गज अभिनेते सचिन व अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची एकुलती एक लेक आहे. आपल्या आई-बाबांच्या पावलावर पाऊल टाकत तिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. श्रियाने नुकतीच ‘व्हायफळ’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से सांगितले.

श्रियाबद्दल आजही अनेकांना तिला मराठी वाचता येत नाही असा गैरसमज आहे. याबद्दल अभिनेत्रीला या मुलाखतीत विचारण्यात आलं. याविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली, “काही जणांना असं वाटतं मला मराठी वाचता येत नाही. पण, असं नाहीये…मला व्यवस्थित मराठी वाचता येतं. अर्थात असं विचारणं स्वाभाविक आहे कारण, माझ्या ओळखीतल्या अनेक महाराष्ट्रीय मित्रमंडळींना मराठी वाचता येत नाही. मी पाचवीपर्यंत ICSE बोर्डात होते. माझ्या त्या शाळेत पाचवीनंतर मराठी विषय ठेवणार नव्हते. ही गोष्ट समल्यावर आईने माझी बदलण्याचा निर्णय घेतला. माझी शाळा बदलून तिने मला SSC बोर्डात घातलं. जेणेकरून मला मराठी या विषयाचं व्यवस्थित शिक्षण मिळेल.”

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेने घेतलं नवीन घर, म्हणाली, “आज एक स्वप्न…”

श्रिया पुढे म्हणाली, “शाळेमुळे मला मराठी उत्तम वाचता आणि लिहिता येतं. अर्थात मला मराठी पुस्तक वाचण्याची फारशी सवय नाही. पण, मला कोणी मराठी पुस्तक दिलं, तर मी नक्की वाचते. आई मला लहानपणी अनेक मराठी पुस्तक वाचायला द्यायची. त्यात लहान-लहान मराठी गोष्टी असायच्या.”

हेही वाचा : “एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ‘त्या’ घटनेमुळे अंकिता लोखंडेवर संतापली! मनारा चोप्राबद्दल म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Shriya Pilgaonkar (@shriya.pilgaonkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझे आजोबा मला पु.ल.देशपांडेंच्या गोष्टी सांगायचे. मी मराठी पुस्तक उत्तमप्रकारे वाचू शकते. पण, सध्या कामामुळे माझं फारसं वाचन होत नाही. शूटिंग करताना स्क्रिप्ट सुद्धा मी मूळ देवनागरी भाषेत वाचते. तेच मला जास्त सोयीस्कर वाटतं.” असं श्रियाने सांगितलं.