बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत मागच्या काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. मागच्या काही महिन्यापासून उर्वशी रौतेलाचं नाव क्रिकेटर ऋषभ पंतशी जोडलं जातंय. अर्थात यावरून ऋषभ आणि उर्वशी यांच्या सोशल मीडियावर भांडणही झाली आहे. दोघांनीही सोशल मीडिया पोस्टवरून एकमेकांना सुनावलं होतं. पण तरीही भारतीय संघाच्या सामन्यांना उर्वशीची उपस्थिती पुन्हा पुन्हा या दोघांच्या नावाच्या सुरू होण्यासाठी पुरेशी ठरते. पण या दोघांमध्ये नेमकं काय नातं आहे हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये मात्र कमालीची उत्सुकता असून आता या नात्याचं सत्य ऋषभचा मित्र आणि क्रिकेटर शुबमन गिलने उघड केलं आहे.

शुबमन गिलच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मुलाखत घेणारी अँकर शुबमनला उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. “आजकाल ऋषभ पंतला उर्वशी रौतेलाच्या नावाने खूपदा चिडवलं जातं. सोशल मीडियावर याची चर्चा होते. पण टीममध्ये कसं वातावरण असतं. टीममध्येही त्याला तिच्या नावाने चिडवलं जातं का?” असा प्रश्न ती अँकर शुबमनला विचारताना दिसते.

आणखी वाचा- “उर्वशी बोलवतेय” म्हणणाऱ्या चाहत्यांवर भडकला ऋषभ पंत; म्हणाला, “जाऊन…” ; पाहा Viral Video

मुलाखतीत अँकरने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना शुबमन म्हणाला, “उर्वशी स्वतःच काही ना काही करत असते आणि लोकांनी तिला चिडवावं यासाठी त्यांना संधी देत असते. या सगळ्याशी ऋषभ पंतचा काही संबंध नाही. त्याच्या बाजूने उर्वशीसाठी कोणत्याही भावना नाहीत.” याशिवाय जेव्हा त्याला विचारण्यात आलं की, ‘या सगळ्याचा ऋषभवर काही परिणाम होतो का?’ त्यावर तो म्हणाला, “नाही, त्याला या सगळ्या गोष्टींमुळे काहीच फरक पडत नाही. कारण यात काहीच तथ्य नाही हे त्याला माहीत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान एका मुलाखतीनंतर उर्वशी आणि पंत यांच्यादरम्यान सोशल मीडियावर थेट एकमेकांचा उल्लेख न करता बराच काळ वाद सुरु होता. या मुलाखतीत उर्वशीने ‘RP’ नामक एका व्यक्तीने हॉटेल लॉबीमध्ये माझी ८ तास वाट पाहिली असा उल्लेख केला होता. यात तिने ऋषभचं नाव घेतलं नव्हतं पण अनेकांनी तिचा इशारा ऋषभकडे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पंतने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. यामध्ये त्याने, “मेरा पीछा छोड़ो बहन” असं म्हटलं होतं. त्यांचा हा वाद बराच गाजला होता.