बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​सध्या त्याच्या ‘योद्धा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सिद्धार्थसह राशि खन्ना आणि दिशा पटानी देखील महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अलीकडेच एका मुलाखतीमध्ये संवाद साधताना सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या पहिल्या पगाराबद्दल बोलताना त्याच्या स्ट्रगलिंगच्या दिवसांबद्दल खुलासा केला आहे.

सिद्धार्थ मल्होत्राने सांगितले की, जेव्हा तो या क्षेत्रात काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करत होता, तेव्हा सॅमसंगच्या एका कॅम्पेनमध्ये काम करण्यासाठी त्याला पहिला पगार मिळाला होता. त्यांचा पहिला पगार फक्त दोन ते तीन हजार रुपये इतकाच होता. या मुलाखतीदरम्यान सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या याच स्ट्रगलच्या दिवसांना उजाळा दिला आणि मुंबईत येण्यामागची कहाणी सांगितली.

आणखी वाचा : धनुषच्या आगामी ‘इलयाराजा’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “एक स्वप्न…”

सिद्धार्थ म्हणाला, “‘मी एक वर्ष प्रशिक्षण घेतले, पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीत प्रवेश करता तेव्हा तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.” २०१२ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्राने अनेक सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. या अभिनेत्याने वयाच्या १८ व्या वर्षी मॉडेलिंगमधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. याबरोबरच करण जोहरच्या ‘माय नेम ईज खान’ या चित्रपटादरम्यान त्याचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही सिद्धार्थने काम केलं होतं.

सिद्धार्थच्या नुकत्याच आलेल्या ‘योद्धा’ बद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने अरुण कात्यालची भूमिका चांगली साकारली आहे. ‘योद्धा’ ही एक निलंबित आर्मी ऑफिसर अरुण कात्यालची कथा आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ही धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती आहे. हा चित्रपट या शुक्रवार १५ मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झळ. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.