गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी, आधीच्या ड्रायव्हरने लंपास केले ७२ लाख

सोनू निगम यांची बहीण निकिता हिने बुधवारी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार दाखल केली.

sonu-nigam

मनोरंजन सृष्टीतील आघाडीचा गायक सोनू निगम याच्या वडिलांच्या घरी चोरी झाल्याचं समोर आलं आहे. चोरीला गेलेली रक्कम अत्तर लाख आहे. सोनू निगमच्या बहिणीने त्यांच्या वडिलांच्या मुंबईच्या घरी चोरी झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. तर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर ही चोरी त्यांच्या आधीच्या ड्रायव्हरने केली असल्याचं कळलं.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

सोनू निगमचे वडील अगमकुमार (वय ७२) हे मुंबईतील ओशिवरा, अंधेरी पश्चिम परिसरात राहतात. या घरातून ही चोरी १९ आणि २० मार्च दरम्यान झाली आहे. सोनू निगम यांची बहीण निकिता हिने बुधवारी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार आज दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार सोनू निगमच्या वडिलांकडे रेहान नावाचा ड्रायव्हर आठ महिने काम करत होता. परंतु त्याचं काम चोख नसल्याने सोनू निगमच्या वडिलांनी त्याला कामावरून काढून टाकलं होतं.

रविवारी दुपारी २० मार्च रोजी सोनू निगमचे वडील निकिताच्या घरी वर्सोवा येथे गेले होते. संध्याकाळी तिथून परतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या डिजिटल लॉकरमधून ४० लाखांची रक्कम चोरीला गेली होती. ही गोष्ट त्यांनी लगेच फोन करून त्यांच्या मुलीच्या कानावर घातली. तर दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या मुलाच्या घरी 7 बंगला येथे व्हिसा संदर्भातील कामासाठी गेले होते. तिथून सायंकाळी परत आल्यावर त्यांच्या लॉकरमधून आणखीन ३२ लाख गायब झाले होते. त्या लॉकरचं कोणतंही नुकसान झालेलं नव्हतं.

त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर त्यांचा आधीचा ड्रायव्हर रेहान हातात बॅग घेऊन दोन्ही दिवस ते घरी नसताना त्यांच्या घराकडे जाताना दिसला. डुप्लिकेट चावी वापरून त्यांच्या घरी घुसून चोरी केली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आता निकिताच्या तक्रारीनुसार पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 20:25 IST
Next Story
बागेश्वर धामवर लवकरच चित्रपट येणार! ‘या’ निर्मात्याने केली मोठी घोषणा
Exit mobile version