Sonakshi Sinha On Body Shaming : बॉडी शेमिंग हा अनेकदा चर्चेत राहिलेला विषय आहे. अनेकांना त्यांच्या वाढत्या वजनावरून सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. त्यातून सेलिब्रिटीदेखील काही सुटलेले नाहीत. अनेक अभिनेत्रींच्या बॉडी शेमिंगबद्दल नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असतात. त्यात आता सोशल मीडियामुळे तर या चर्चा अधिकच होतात.
अभिनेत्रींच्या एखाद्या व्हायरल फोटो-व्हिडीओवर बॉडी शेमिंग करण्यासाठी काही ट्रोलर्स टपलेलेच असतात. बॉडी शेमिंगला सामोरी गेलेली अशीच एक अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा. ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं आजवर आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक प्रेक्षकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं आहे.
मात्र, आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सोनाक्षीला आजही तिच्या वाढत्या वजनावरील ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. स्वत:वरील बॉडी शेमिंगबद्दल अभिनेत्रीनं याआधीही अनेकदा आपलं मत व्यक्त केलं आहे. अशातच नुकत्याच एका मुलाखतीतही तिनं बॉडी शेमिंगबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. या मुलाखतीत अभिनेत्रीनं शाळेपासूनच माझ्या वाढत्या वजनाबद्दल टीका होत असल्याचं म्हटलं आहे आणि ही टीका आजही होताना दिसते, असंही ती म्हणाली.
रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली, “शाळेपासूनच माझ्या वजनाबद्दल व लूक्सबद्दल बोललं गेलंय आणि ते आजही सुरूच आहे. आजही अनेक लोक माझ्या वजनावर बोलतात; पण मी त्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं आहे. मी लग्नानंतर या चर्चा खूपच ऐकत आहे. वजनामुळे अनेकांना असं वाटतं की, ही एक तर मी प्रेग्नंट आहे किंवा हिला कामच करायचं नाहीय. माहीत नाही लोकांना काय झालंय?”
त्यानंतर सोनाक्षी सांगते, “लहानपणी मला गोलू आणि मोटू म्हणून चिडवलं जायचं; पण आता त्याबद्दल काही वाटत नाही. मी आता एका क्षेत्रात आहे, जिथे मी स्त्रियांच्या वजनाबद्दल आणि बॉडी शेमिंगबद्दल चित्रपट करते. त्यामुळे मला असं वाटतं की, मी त्यासाठीच बनले आहे; पण माझं वजन जास्त असूनही किंवा मी जाड असूनही मला त्याबद्दल कधीच काही वाटलं नाही. मी लहानपणापासूनच खूप आत्मविश्वासू आहे. मला लहानपणी वाटलं नव्हतं की, मी कधी अशा क्षेत्रात येईन जिथे लूक्स आणि तुम्ही कसे दिसतता हे महत्त्वाचं असेल.”
सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. ती नवरा झहीरबरोबरचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असते. सोनाक्षी सिन्हानं २३ जून २०२४ रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न केलं. वजनावरील ट्रोलिंगसह तिला तिच्या लग्नावरूनही ट्रोल केलं गेलं. सोनाक्षी हिंदू आणि झहीर मुस्लीम असल्याने या दोघांना बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
