Sonali Bendre Shared A Post For Mother : सोनाली बेंद्रे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती सध्या टेलिव्हिजनवरील ‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. अशातच आता तिने नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
सोनाली बेंद्रे सोशल मीडियावरही सक्रिय असते. अभिनेत्रीचा तिथे मोठा चाहतावर्ग आहे. अशातच आता तिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिच्या आईसाठी पोस्ट केली आहे. यावेळी तिने आईबरोबरचा एक गोड फोटोही शेअर केला आहे.
सोनाली बेंद्रेने मानले आईचे आभार
सोनालीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तिने “वाढदिवसाच्या शुभेच्छा आई, तुझ्याकडून मिळणाऱ्या प्रेमासाठी कायम ऋणी आहे. तू केलेल्या प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी धन्यवाद”, असं म्हणत तिने तिच्या आईचे आभारही मानले आहेत.
सोनाली अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यासह ती अनेकदा तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटोही पोस्ट करते. अभिनेत्रीचे चाहते त्यावर कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव करतात.
सोनाली सध्या ‘कलर्स टीव्ही’वरील ‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमामुळे चर्चेत असून यामध्ये ती सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून झळकत आहे. यामध्ये तिच्यासह स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीसुद्धा सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडत आहे; तर या कार्यक्रमात अनेक लोकप्रिय बॉलीवूड सेलिब्रिटी कपलनी सहभाग घेतला आहे.
सोनाली बेंद्रे सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमाच्या सेटवर नुकतीच ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री अविका गौरचं लग्न पार पडल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्रीने तिच्या खऱ्या आयुष्यातील प्रियकराबरोबर नॅश्नल टेलिव्हिजनवर लग्न केलं. यावेळी दोघांनी अगदी थाटामाटात पारंपरिक पद्धतीने अनेक लोकप्रिय कलाकारांच्या उपस्थितीत लग्न केलं.

दरम्यान, सोनाली बेंद्रेबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्री ‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमापूर्वी रेमो डिसोझाच्या ‘बी हॅपी’ चित्रपटातून झळकलेली. लवकरच ती अली फेझलबरोबर नवीन वेब सीरिजमधून झळकणार आहे.