Sonam Chhabra Cannes Video Viral: मागील काही दिवसांपासून जगभरात कान्स फिल्म फेस्टिव्हलची चर्चा होत आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय कलाकार, फॅशन डिझायनर व इन्फ्लुएन्सर्स आपल्या स्टायलिश लूकने लक्ष वेधून घेतात. यंदा ऐश्वर्या राय बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, जान्हवी कपूर, नॅन्सी त्यागी, करण टॅकरसह अनेक कलाकारांनी कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा दाखवला. या सर्वांमध्ये एका भारतीय तरुणीने दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख असलेला ड्रेस परिधान केला.

दिल्लीतील करोल बाग येथील लोकप्रिय फॅशन व लाइफस्टाइल इन्फ्लुएन्सर सोनम छाब्राने तिच्या आउटफिटच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्यात जीव गमावणाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.

सोनम छाब्राचा पांढरा स्कर्ट आणि सिल्व्हर कॉर्सेट सेट फॅशन डिझायनर चारू भसीनने डिझाइन केला आहे. सिल्व्हर कॉर्सेटवर अनोखी डिझाईन आहे. पण डिझाइनचे वजन जास्त असल्याने ते पुढे वाकले आहे. त्याचबरोबर कोरीव काम करून त्याला एक आकर्षक लूक देण्यात आला आहे. तसेच, बॅकलेस डिझाइनमुळे हा ड्रेस आणखी ग्लॅमरस दिसतो.

सोनमने लांब ट्रेल असलेला पांढरा स्कर्ट घातला आणि त्यावर मॅचिंग कॅप देखील स्टाइल केली आहे. ज्यावर गेल्या काही वर्षात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्याचबरोबर ‘Unbroken’ असा मेसेज देऊन शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. स्कर्टच्या प्लेट्सचे डिटेलिंग उत्तम आहे.

पाहा व्हिडीओ-

सोनम छाब्राने त्या सिल्व्हर कॉर्सेट ड्रेसबरोबर मॅचिंग होतील अशा अॅक्सेसरीज कॅरी केल्या होत्या. तिने सिल्व्हर बँगल्स आणि अंगठी घातली आहे. तसेच केसही तिने अॅक्सेसरीजने स्टाईल केले, ज्यामुळे तिचा लूक खूपच आकर्षक वाटत होता. सोनमने मेकअप छान केला होता, ज्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काहींना सोनमचा हा ड्रेस आवडला, तर काहींनी मात्र बोल्ड लूक असल्याने नाराजी व्यक्त केली. डीप कॉर्सेट असल्याने असे कपडे घालून दहशतवादी हल्ल्यात जीव गमावणाऱ्या श्रद्धांजली वाहणार का? असा प्रश्न काही युजर्सनी विचारला. तसेच काहींच्या मते हे श्रद्धांजली वाहणं नव्हतं तर तिने लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे सगळं केलं.