Soni Razdan on life she married Mahesh Bhatt: बॉलीवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांची ओळख एखाद्या चित्रपटाच्या सेटवर झाली किंवा एखाद्या कलाकाराच्या पार्टीमध्ये किंवा मित्रांमुळे ओळख झाली आणि पुढे जाऊन त्यांनी लग्न केले. अनेक निर्माते व कलाकार अशा जोड्याही बॉलीवूडमध्ये पाहायला मिळतात.

अनेकदा अभिनेत्रींनी यशस्वी कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्याशी लग्न केले, तर त्यांना पुढे काम करण्याची गरज राहत नाही, असे समजले नाही. सोनी राजदान व निर्माते महेश भट्ट ही त्यापैकी एक जोडी आहे. त्यांनी १९८६ साली लग्नगाठ बांधली. त्याआधी त्या चित्रपटसृष्टीत काम करीत होत्या.

“त्यामुळे मला काही कामाची गरज…”

त्यांनी स्वत:ची एक ओळख निर्माण केली होती. पण, त्यांच्या लग्नानंतर त्यांना चित्रपटाच्या ऑफर मिळणे कमी झाले. याचे कारण म्हणजे लोकांचा असा समज झाला होता की, ती आता एका लोकप्रिय दिग्दर्शकाची पत्नी आहे. त्यामुळे आता तिला कामाची गरज नाही.

‘न्यूज १८ शोशा’ला अभिनेत्रीने मुलाखत दिली. यावेळी सोनी राजदान म्हणाल्या, “मी जेव्हा अभिनय क्षेत्रात कामाला सुरुवात केली, त्यावेळी चांगले काम करत होते. त्यानंतर मी लग्न केले. त्यानंतर मला अचानक कामासाठी विचारणा होणे बंद झाले. मला कुठून तरी असे ऐकायला मिळाले की, मी आता अमुक या व्यक्तीची पत्नी आहे. त्यामुळे मला काही कामाची गरज नाही. सुदैवाने मला बुनियाद चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर खरंच काही चांगल्या चित्रपटात मला भूमिका मिळाल्या.”

सोनी राजदान यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, कायमच त्यांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीची नातलग म्हणून ओळख मिळाली. त्या म्हणाल्या, “माझ्या संपूर्ण आयुष्यात आणि आताही मला कोणाची तर नातलग म्हणूनच ओळखतात.” सोनी राजदान यांना त्यांच्या कामापेक्षा महेश भट्ट यांची पत्नी, तसेच आलिया भट्टची आई म्हणून ओळखले जाते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आजही सोनी राजदान अभिनय क्षेत्रात सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सध्या त्या ‘बर्डस् ऑफ पॅराडाइज’मध्ये दिसत आहेत. हा शो अमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

सोनी राजदान व महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने आतापर्यंत विविध चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याबरोबरच आलिया तिचा नवरा रणबीर कपूर व लेक राहा कपूर यांच्यामुळेदेखील चर्चेत असते. आलियाच्या सोशल मीडियावरील पोस्ट लक्ष वेधून घेत असतात.