South Director Announces Film Based On Ramayana Aliya Bhatt To Play Sita : गेल्या काही वर्षांपासून भारतीय पौराणिक कथा हा अनेक बॉलीवूड चित्रपट निर्मात्यांचा नवा आवडता विषय बनला आहे. दिग्दर्शक ओम राऊतने रामायणावर आधारित चित्रपट बनवला होता. परंतु, तो प्रेक्षकांच्या फार पसंतीस पडला नाही. त्यानंतर नितेश तिवारींनी ‘रामायण’ चित्रपटाची घोषणा केली. अशातच आता लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शकही रामायणवर आधारित चित्रपट बनवणार आहे.

दाक्षिणात्य दिग्दर्शक विष्णू मंचू यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये रामायणवर आधारित चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांनी नुकतंच नयनदीप रक्षितला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी रामायणवर आधारित चित्रपट करणार असून त्याची स्क्रिप्टही तयार असल्याचं म्हटलं आहे. यामधून ते रावणाची कथा मांडणार आहेत.

मुलाखतीमध्ये त्यांना या चित्रपटासाठी ते कोणत्या कलाकारांची निवड करणार आहेत, असा प्रश्न विचारला असताना ते म्हणाले, “प्रभू राम व सीतेच्या भूमिकेसाठी माझ्या डोळ्यांसमोर दोन कलाकार येतात. रामाच्या भूमिकेसाठी अभिनेता सूर्या, तर सीतेच्या भूमिकेसाठी आलिया भट्ट.

विष्णू मंचू पुढे म्हणाले, “या चित्रपटाची संहिता तयार असून हा रावणाची कथा सांगणारा चित्रपट आहे. हा त्याचा जन्म, मृत्यू यावर आधारित असणार आहे.” दिग्दर्शक पुढे म्हणाले, “२००९ साली मी सूर्याला यासाठी विचारलं होतं, पण त्यावेळी बजेटसंबंधित गोष्टी न जुळल्याने त्याचं पुढे काही झालं नाही.”

“प्रसिद्ध दिग्दर्शक राघवेंद्र राव या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते. माझे वडील त्यामध्ये रावणाची भूमिका साकारणार होते. माझ्याकडे रावणाची कथा सांगणारी संहिता व संवाद तयार आहेत, पण मला माहीत नाही, मला कधी ते करणं शक्य होईल की नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विष्णू मंचू पुढे म्हणाले, “मला या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारण्याची इच्छा आहे, पण दिग्दर्शक राघवेंद्र राव यांना मी इंद्रजीतची भूमिका साकारावी असं वाटतं. मला मात्र सूर्याच्या भावाने कार्तीने ही भूमिका साकारावी असं वाटतं. लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी मला ज्युनिअर एनटीआरचा मोठा भाऊ योग्य वाटतो, तर जटायूच्या भूमिकेसाठी मला सत्यराज सर योग्य वाटतात. त्यांनी बाहुबलीमध्ये कटप्पा ही भूमिका साकारली होती.