scorecardresearch

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला श्रीदेवींबरोबर डेटवर जायचं होतं पण…; खुलासा करत म्हणाला “मी…”

दाक्षिणात्य अभिनेत्याची श्रीदेवींबरोबर डेटवर जाण्याची इच्छा होती पण…

nani wanted to date sridevi
दाक्षिणात्य अभिनेत्याचा खुलासा. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दाक्षिणात्य अभिनेता नानी सध्या त्याच्या ‘दसरा’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नानीने अनेक चित्रपटांतून काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘हिट’, ‘जर्सी’, ‘मख्खी’, ‘पैसा’ यांसारख्या चित्रपटांमधून नानीने अभिनयाचा ठसा उमटवला. सध्या नानाी ‘दसरा’ चित्रपटाच्या प्रमोशमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवींचा चाहता असल्याचा खुलासा केला आहे.

नानीने नुकतील ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने श्रीदेवींबरोबर डेटवर जाण्याची इच्छा असल्याचंही व्यक्त केलं. नानी म्हणाला, “श्रीदेवींबरोबर डेटवर जाण्याचं माझं स्वप्न होतं. पण दुर्दैवाने त्या आज आपल्यात नाहीत. मी लहानपणापासूनच त्यांचा मोठा चाहता आहे. आजही मी त्यांचा चाहता आहे. ‘क्षणा क्षणम’ या तेलुगु चित्रपटात त्यांना पाहणं माझ्यासाठी आजही तितकंच काल्पनिक आहे”.

हेही वाचा>> Video: ‘वेडात मराठे…’ चित्रपटासाठी खूप मेहनत घेतोय ‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणे, जीममधील व्हिडीओ व्हायरल

‘दसरा’ चित्रपटाबद्दल नानी म्हणाला, “गेल्यावर्षी ‘आरआरआर’ तेलुगु चित्रपटसृ्ष्टीतील हिट होता. तर ‘केजीएफ’ व ‘कांतारा’ कन्नड चित्रपटसृष्टीतील चित्रपट हिट ठरले. यावर्षी २०२३मध्ये तेलुगु चित्रपटसृष्टीतील ‘दसरा’ हा चित्रपट असेल.”

हेही वाचा>> “त्यांना महात्मा गांधींच्या…”, एकेरी उल्लेख करत शरद पोंक्षेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले, “वीर सावरकर अन्…”

नानी मुख्य भूमिकेत असलेला ‘दसरा’ चित्रपट येत्या ३० मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तेलुगुबरोबरच तमिळ, हिंदी, मल्याळम व कन्नड या भाषांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नानीसह किर्ती सुरेश, साई कुमार हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 11:45 IST

संबंधित बातम्या