दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तमन्ना ‘डार्लिंग’ फेम अभिनेता विजय वर्माला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तमन्ना व विजयचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

तमन्ना भाटियाच्या फॅन पेजवरुन विजय वर्माबरोबरचा तिचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ३१ डिसेंबरच्या पार्टीचा हा व्हिडीओ असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. या व्हिडीओत एक कपल एकमेकांना किस करताना दिसत आहेत. हे दुसरे तिसरे कोणी नसून तमन्ना व विजय असल्याचं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> Video: बिग बॉसने दिलेलं सरप्राइज पाहून राखी सावंत रडली, चाहते म्हणतात “हिच्या नादात प्रसादला…”

तमन्ना भाटिया व विजय वर्मा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. याआधीही दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. परंतु, तमन्नाने याबाबत अजून कोणताही खुलासा केलेला नाही.

हेही वाचा>> “…म्हणून मी गरोदर असल्याचं सगळ्यांपासून लपवलं”, आलिया भट्टचा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तमन्ना व विजय वर्माच्या या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशिपबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. हे दोघेही लस्ट स्टोरीज २मध्ये एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.