भारतीय फलंदाज केएल राहुलने २३ जानेवारी २०२३ रोजी अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आणि बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्नगाठ बांधली. सुनील शेट्टी क्रिकेटचा खूप मोठा चाहता आहे. अनेकदा तो सोशल मीडियाच्या माध्यमातून जावई केएल राहुल आणि भारतीय टीमचं कौतुक करत असतो. पण, सुनील शेट्टीचा आवडता खेळाडू त्याचा जावई नसून दुसराच कोणीतरी आहे. याबद्दल त्याने नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

हेही वाचा : Video: भीषण कार अपघातानंतर पहिल्यांदाच गायत्री जोशी आली समोर; पतीसह एका कार्यक्रमात झाली होती सहभागी

सुनील शेट्टी अलीकडेच ‘मनी कंट्रोल क्रिएटर इकोनॉमी समिट’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी युट्यूबर निहारिका एनएमने सुनील शेट्टीला त्याच्या आवडत्या क्रिकेटरचं नाव काय? असा प्रश्न विचारला. यावर बॉलीवूडचा अण्णा म्हणाला, “सध्याच्या भारतीय टीममध्ये माझा आवडता क्रिकेटर विराट कोहली आहे. आजच्या घडीला तो टीमचा चेजिंग मास्टर आहे.”

हेही वाचा : महाराष्ट्रात गाजलेलं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटक रचणार नवा इतिहास, शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत

सुनील शेट्टीचं उत्तर ऐकून निहारिका आश्चर्यचकीत झाल्याचं पाहायला मिळालं. कारण, अण्णा त्याच्या लाडक्या जावयाचं नाव घेईल असं तिला अपेक्षित होतं. यावर अभिनेता म्हणाला, “केएल माझ्या मुलासारखा आहे ही गोष्ट आता सगळ्यांनाच माहिती आहे. तो माझ्या परिवाराचा एक सदस्य असल्याने आवड-निवड सांगताना त्याचं स्थान माझ्यासाठी नेहमीच वेगळं असतं. आता अहान आणि केएल राहुल अशी दोन मुलं मला आहेत.”

हेही वाचा : ठरलं तर मग : अखेर सायली घरच्यांना सांगणार गरोदर नसल्याचं सत्य! ‘या’ दिवशी असेल विशेष भाग, प्रोमो आला समोर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थित अण्णाच्या लाडक्या लेकीचा विवाहसोहळा दाक्षिणात्य पद्धतीने जानेवारीत पार पडला होता. सुनील शेट्टी नेहमीच लेक आणि जावयाचं कौतुक करत असतो.