टोमॅटोच्या वाढत्या दराचा परिणाम फक्त सर्वसामान्यांवरच नाही, तर सुपरस्टार्सवरही होत आहे. याबाबत बॉलीवू़डचा अन्ना म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सुनील शेट्टीने एक विधान केलं होतं. एका मुलाखतीत सुनील शेट्टीनं टोमॅटो महागल्यानं चिंताही व्यक्त केली. यामुळे त्याला लोकांनी बरंच ट्रोल केलं होतं.

‘आज तक’शी संवाद साधताना सुनील शेट्टी म्हणाला की, “माझी पत्नी एक-दोन दिवसांचा भाजीपाला घरी आणते. आम्ही जास्त करून ताज्या भाज्यांचा वापर करतो. सध्या टोमॅटोचे दर वाढत आहेत, याचा परिणाम आमच्या स्वयंपाकघरावर झाला आहे. मी या दिवसात टोमॅटो खाणं कमी केलं आहे. लोकांना असं वाटतं की, सुपरस्टार आहेत, त्यांच्यावर महागाईचा काय परिणाम होत नाही. असं काही नसतं. आम्हीही या महागाईला सामोर जात असतो.” सुनीलच्या या व्यक्तव्याची बऱ्याच लोकांनी खिल्ली उडवली. नुकतंच त्याने त्याचं हे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

आणखी वाचा : मीना कुमारी यांच्यावरील बायोपिक अडचणीत; अभिनेत्रीच्या सुपुत्राने बॉलिवूडची केली कानउघडणी

‘एबीपी’च्या वृत्तानुसार सुनील शेट्टी म्हणाला, “माझ्या व्यक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत मी चुकीचा विचार कधीच करणार नाही, उलट मी कायम त्यांना पाठिंबा दिला आहे. आपण नेहमीच आपल्या मातीतल्या गोष्टींचा प्रचार करायला हवा तरच आपल्या शेतकऱ्याचं भलं होईल. मी हॉटेल व्यवसायात असल्याने माझे त्यांच्याशी थेट संबंध आहेत. जर माझ्या वक्तव्यामुळे ते दुखावले असतील तर त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. मी स्वप्नातही त्यांच्याविरुद्ध बोलायचा विचार करणार नाही.”

View this post on Instagram

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनील शेट्टीने केलेल्या वक्तव्यानंतर परळीतील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संतोष मुंडे यांनी सुनीलला टोमॅटोचे पार्सल पाठवले होते तर इतरही काही नेत्यांनी सुनीलवर टीका केली होती. आता सुनील शेट्टीने त्याच्याकडून स्पष्टीकरण देऊन या मुद्द्यावर पडदा टाकला आहे आणि आपलं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडू नये अशी विनंतीही त्याने मीडियाला केली आहे.