Sunita Ahuja Talks About Govindas Affairs Rumours : अभिनेता गोविंदा व पत्नी सुनीता आहुजा कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांत अनेकदा त्यांच्या घटस्फोटाबद्दलच्या अफवा सोशल मीडियावर चर्चेचा विषय होता. परंतु, गणेश चतुर्थीत दोघांनी एकत्र मीडियासमोर येत या अफवा खोट्या ठरवल्या. अशातच आता सुनीता यांनी गोविंदाच्या कुटुंबाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

सुनीता आहुजा अनेकदा पती गोविंदाबद्दल स्पष्ट प्रतिक्रिया देत असतात. अशातच आता त्यांनी त्यांच्या ब्लॉगमधून गोविंदा व त्याच्या कुटुंबीयांबद्दल सांगितलं आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरील ब्लॉगमध्ये त्यांनी म्हटलं, “त्याच्या कुटुंबातीला लोकांना आम्हाला दोघांन एकत्र बघायला आवडत नाही. त्यांना आम्ही एवढे आनंदी कसे आहोत हा प्रश्न पडतो. कारण- त्यांची बायको, मुलं हयात नाहीयेत.”

सुनीता आहुजा पुढे म्हणाल्या, “गोविंदा चांगल्या माणसांबरोबर उठत-बसत नाही. त्यामुळे माझं म्हणणं असतं की, तुम्ही चुकीच्या लोकांच्या संपर्कात राहिलात, तर तुम्हीसुद्धा तसेच व्हाल. माझे फार मित्र नाहीयेत; माझी मुलंच माझे मित्र-मैत्रिणी आहेत.”

गोविंदाच्या अफेअरच्या अफवांबद्दल सुनीता आहुजा यांची प्रतिक्रिया

सुनीता पुढे गोविंदाच्या आईबद्दल म्हणाल्या, “सासूबाई त्याला म्हणालेल्या की, तू लग्न केलंस, तर सुनीताबरोबरच करशील आणि जर तू कधी तिची फसवणूक केलीस, तर तू भिकारी होशील, असे त्यांचे शब्द होते.” सुनीता पुढे गोविंदाच्या अफेअरबद्दल म्हणाल्या, “ज्या दिवशी मला त्याच्या अफेअरबद्दल कळेल की, तो माझा विश्वासघात करीत आहे. तेव्हा मी स्वत: मीडियासमोर जाऊन याबद्दल सांगेन की, ह्यानं मला धोका दिला आहे.”

सुनीता पुढे म्हणाल्या, “जो चांगल्या स्त्रीला दु:ख देईल ना तो कधीच सुखी होणार नाही. मी माझं पूर्ण आयुष्य त्याला दिलं. आजही मी त्याच्यावर तेवढंच प्रेम करते.”