Sunita Ahuja Talks About Govinda : बॉलीवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता ही जोडी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच आता सुनीता यांनी गोविंदाबद्दल सांगितलं आहे. त्यांनी गोविंदा पुढच्या जन्मी पुन्हा नवरा म्हणून नको, असं म्हटलं आहे आणि त्याचं कौतुकही केलं आहे.
सुनीता अनेक मुलाखती देत असतात आणि अनेकदा त्या त्यामधून त्यांच्या नवऱ्याबद्दल, मुलांबद्दल खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसतात. अशातच त्यांनी आता नुकतीच ‘पिंकव्हिला’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी गोविंदाबद्दल सांगितलं आहे.
सुनीता यांनी या मुलाखतीत त्यांना खोटं बोललेलं आवडत नाही. जेव्हा कोणी खोटं बोलतं तेव्हा त्यांना वाईट वाटतं आणि त्यांना स्पष्टता ठेवायला आवडते. असं म्हटलं आहे. पुढे त्यांना गोविंदाबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “गोविंदा हीरो आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल मी काय बोलू? हीरो बायकोपेक्षा जास्त वेळ हिरॉइनबरोबर राहायचे. गोविंदा शूटिंगसाठी ४० बाहेर गेल्यानंतर माझी मुलं तर लहान असायची तेव्हा. मी घरी असायचे माझ्या सासुबाईंबरोबर त्यामुळे मी कायच बोलू. पण, हीरोची बायको होण्यासाठी खूप कठोर व्हावं लागतं. सोपं नसतं. हे मला लग्नाच्या ३८ वर्षांनंतर कळतंय तारुण्यात कळलं नाही प्रेम इतकं असायचं की कधी फार विचार केला नाही.”
गोविंदा चांगला नवरा नाही – सुनीता आहुजा
सुनीता यांना पुढे “जेव्हा आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असतं तेव्हा आपण मला हीच व्यक्ती पुढच्या सात जन्मात जोडीदार म्हणून हवी असं म्हणतो.” असं सांगितल्यानंतर त्या गोविंदाबद्दल म्हणाल्या, “नाही. मला नकोय. मी कपिलच्या शोमध्येही याबद्दल सांगितलं आहे. गोविंदा मुलगा म्हणून, भाऊ म्हणून खूप चांगला आहे; पण नवरा नाही. मी आधीच सांगितलं आहे- चिची, तू माझा मुलगा म्हणून जन्म घे; पण नवरा म्हणून तू नकोय. सात जन्म नकोय हा जन्मच पुरेसा आहे.”
सुनीता पुढे गोविंदाबद्दल म्हणाल्या, “मला खूप आनंद व्हायचा की, तो त्याच्या आईवर इतकं प्रेम करतोय. रात्री चार शिफ्ट करून आल्यानतंरही तो त्याच्या आईचे पाय चेपून द्यायचा. मी कधीच त्याला याबद्दल काहीच बोलले नाही. मी का बोलू ?आज यशलाही कोणी बोलू शकत नाही. माझा मुलगाही माझ्यावर खूप प्रेम करतो.”
