Sunny Deol Confirms His Role in Ramayana : रामायण हे महाकाव्य भारतात फार प्रसिद्ध आहे. त्यावर आधारित नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखालील ‘रामायण’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. तसेच बॉलीवूड अभिनेता सनी देओल या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. त्यावर सनी देओलनं स्वत: भूमिका स्पष्ट केली आहे. तो या चित्रपटाचा भाग असणार असल्याचं त्यानं सांगितलं आहे.

सनी देओल आणि त्याचा भाऊ बॉबी देओल यांनी नुकतीच ‘स्क्रीन’ कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी सनी देओलने तो ‘रामायण’मध्ये काम करणार असल्याचं सांगितलं आणि या चित्रपटातील अन्य माहितीदेखील सांगितली आहे. “‘रामायण’ चित्रपट एक फार मोठा प्रकल्प आहे. त्यामुळे आम्ही हा चित्रपट ‘अवतार’ व ‘प्लॅनेट ऑफ द अॅप्स’ या चित्रपटांसारखा बनविण्याचा प्रयत्न करीत आहोत. निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या डोक्यात हा चित्रपट कसा बनवावा आणि यातील पात्रं प्रेक्षकांसमोर कशी दिसावीत यासाठीचं चित्र स्पष्ट आहे.”

हेही वाचा : दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”

“नितेश तिवारी यांचा हा चित्रपट अतिशय प्रभावी ठरणार आहे”, असं आश्वासनही यावेळी सनी देओलनं दिलं. तो पुढे म्हणाला, “तुम्हाला यात काही स्पेशल इफेक्ट्ससुद्धा दिसतील. त्यामुळे चित्रपट पाहताना खरोखर अशा घटना घडल्या आहेत, यावर तुमचा विश्वास बसेल. खरं सांगायचं तर, मला याची खात्री आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांना खूप जास्त आवडेल.”

सनी देओल ‘रामायण’मध्ये महाबली हनुमान यांच्या भूमिकेत दिसणार, असं म्हटलं जात आहे. मात्र, या कार्यक्रमात त्यानं याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात निर्माते नमित मल्होत्रा यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यांनी एक्स अकाउंटवर चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करीत लिहिलं, “एक दशकाहून आधी मी या महाकाव्याला मोठ्या पडद्यावर आणण्याचा विचार केला होता. ज्यानं पाच हजारांहून जास्त वर्षं कोट्यवधी हृदयांवर राज्य केलं आहे.” या पोस्टरमध्ये ‘रामायण’ चित्रपटाचा पहिला भाग २०२६ मध्ये दिवाळीत आणि दुसरा भाग २०२७ मध्ये दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार, असं लिहिलं होतं.

हेही वाचा : लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूरनंदेखील ‘रेड सी फिल्म फेस्टिवल’मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगबद्दल माहिती सांगितली. “या चित्रपटाचे दोन भाग आहेत. त्यातील पहिल्या भागाचे शूटिंग मी पूर्ण केलं आहे. लवकरच दुसऱ्या भागाचं शूटिंग करणार आहे. या चित्रपटाचा मी एक भाग आहे आणि मला प्रभू राम यांची भूमिका साकारण्यास मिळाली यासाठी मी फार आभारी आहे.”