बॉलिवूड अभिनेता सनी देओल मुख्य भूमिकेत असलेला ‘गदर : एक प्रेम कथा’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. २००१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. गदर चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गदर २’ असं चित्रपटाचं नाव असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सनी देओलने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘गदर २’च्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सनी देओलने डोक्यावर पगडी बांधलेली दिसत आहे. या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गदरमधील तारा सिंगचा हा लूक पाहून नेटकरी अवाक झाले आहेत. सनी देओलच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा>> पूजा सावंतबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर वैभव तत्ववादीचं थेट उत्तर, म्हणाला “आम्ही…”

“पाकिस्तानचा जावई पुन्हा येतोय…आमचा भाऊ तारा सिंग,” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा>> “मला रणबीर कपूरबरोबर रोमान्स…” ऋता दुर्गुळेचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली “त्याचे डोळे…”

अनेकांनी “हिंदुस्तान झिंदाबाद” असंही कमेंटमध्ये म्हटलं आहे.

“खंबीर तारा सिंग,” अशी कमेंटही केली आहे.

अनेक चाहत्यांनी सनी देओलच्या गदर २बाबत आतुर असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा>> प्रियांका चोप्राच्या घरी छापेमारी झाल्यावर टॉवेलमध्ये असलेल्या शाहीद कपूरने उघडलेला दरवाजा अन्…; अभिनेत्री सत्य सांगत म्हणालेली…

‘गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. तब्बल २१ वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याने ‘गदर २’साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटात सनी देओल व अमीशा पटेल मुख्य भूमिकेत असणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny deol shared gadar 2 movie on set photos netizens commented on tara singh look kak
First published on: 14-04-2023 at 17:42 IST