प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ते चित्रपटांबरोबरच स्टार्सबरोबर झालेल्या वादांमुळेही चर्चेत राहिले. सुनील यांचे अक्षय कुमार, सनी देओल यांच्यासह अनेक स्टार्सशी मतभेद झाले. एका मुलाखतीत सुनील यांनी सनी देओलला ‘आयुष्यातील सर्वात काळा अध्याय’ असं म्हटलं आहे.

विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत सुनील म्हणाले की सनीबरोबर काम करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाबरोबर काम करण्यासारखे आहे. सनी ‘जानवर’ चित्रपटात काम करणार होता, पण सुनील यांच्याबरोबरच्या वादानंतर तो सिनेमा अक्षय कुमारने केला. अक्षय व सुनील यांनी सात चित्रपट एकत्र केले, पण नंतर मात्र त्यांच्यातही मतभेद झाले आणि दोघांनी परत कधीच एकत्र काम केले नाही.

सनी देओलबद्दल सुनील म्हणाले, “अक्षय कुमार अजिबात वाईट माणूस नाही. त्याला खूप बदनाम करण्यात आलंय. तो गुणी आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही. सनी देओल माझ्या आयुष्यातील आणि करिअरमधील सर्वात काळा अध्याय आहे, पण देव आहे, तो सगळं बघतोय, तो न्याय करेल.”

तो मोठा स्टार नव्हता – सनी देओल

सनी देओलबरोबरचा वाद नेमका काय? याबद्दल सुनील दर्शन यांनी सांगितलं. “ते खूप शक्तिशाली लोक आहेत आणि त्यांना कशाचाच फरक पडत नाही. पण या सगळ्याचा न्याय कधीतरी होईलच याची मला खात्री आहे. काही गोष्टी इतक्या वाईट आहेत, ज्या मी शब्दांत सांगू शकत नाही. मी त्याच्याबरोबर तीन चित्रपट केले, मी माझा पहिला चित्रपट ‘इंतेकाम’ त्याच्याबरोबर केला. त्यावेळी तो मोठा स्टार नव्हता. मी त्याच्या बऱ्याच चित्रपटांचं वितरण केलं होतं. त्याला ज्या चित्रपटातून लाँच करण्यात आलं, त्यात माझं मोठं योगदान होतं. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मला वाटलं की चित्रपटसृष्टीला त्याच्यासारख्या लोकांची गरज आहे,” असं सुनील म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“इंतेकाम करताना मी थोडा गोंधळलो होतो. पण ‘लूटेरे’ हा दुसरा चित्रपट करताना मला त्याच्या वागण्यात फरक जाणवला. पण तिसऱ्यांदा जेव्हा एकत्र काम करत होतो तेव्हा काहीतरी गडबड आहे याची मला खात्री पटली. प्रॉडक्शनदरम्यान मला वाईट अनुभव आले. मला तो खूप महागात पडला. ते एखाद्या लहान मुलाचे लाड पुरवून काम पूर्ण करायला लावण्यासारखं होतं. मला त्याच्याबरोबर चौथा चित्रपट करायचा नव्हता, पण मी अडकलो होतो. त्याने माझ्या भावनांचा वापर केला, खोट्या गोष्टी सांगितल्या आणि तो स्वतःसाठी करत असलेल्या एका प्रकल्पात त्याने मला सामील करून घेतलं,” असं सुनील दर्शन म्हणाले.