बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल बॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमवत आहे. त्याच्या चित्रपट क्षेत्रातील पदार्पणामुळे तो चर्चेत आहेच, पण आता खासगी आयुष्यामुळेही तो चर्चेत आला आहे. करणने प्रसिद्ध आणि दिवंगत फिल्ममेकर बिमल रॉय यांची पणती द्रिशाशी साखरपुडा केल्याची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा- ३२००० नव्हे तर ‘एवढ्या’ महिलांचे झाले होते धर्मांतर; ‘द केरल स्टोरी’च्या दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

‘पिंकव्हिला’ने दिलेल्या बातमीनुसार बऱ्याच कालावधीपासून करण आणि द्रिशा एकमेकांना डेट करत होते. या जोडीला अनेक ठिकाणी एकत्र पाहिले गेले. परंतु या दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती. मात्र हे दोघे आता लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काल (मंगळवार) धर्मेंद्र आणि हेमा मालिनीच्या लग्नाचा ४३ वा वाढदिवस होता. या दिवशीच करण आणि द्रिशा यांचा साखरपुडा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप देओल कुटुंबीयांकडून या बातमीला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

हेही वाचा- “भीक मागून..”; शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाबाबत अभिनेत्याचे मोठं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

\करणने ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. लवकरच तो अनिल शर्माच्या ‘अपने २’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याचे आजोबा धर्मेंद्र, काका बॉबी देओल आणि वडील सनी देओलही दिसणार आहेत. देओलांच्या या तीन पिढ्यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.