अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या घरातील पाळीव श्वानाचं निधन झालंय. त्याची बहीण प्रियंका सिंहने यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. सुशांतच्या पाळीव कुत्र्याचं नाव ‘फज’ होतं. प्रियंकाने ट्विटरवर दोन फोटो पोस्ट करत त्याच्या निधनाची बातमी दिली.

प्रियांका सिंहने ट्वीटमध्ये लिहिलं की, “खूप दूर गेलास फज! तू तुझ्या मित्राजवळ (सुशांतसिंह जवळ) स्वर्गात पोहोचलास. आपण लवकरच भेटू, तोपर्यंत…” असं कॅप्शन देत तिने दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत फज सुशांतसिंह राजपूतबरोबर दिसतोय. तर, दुसरा फोटो प्रियांकाचा आहे. ती फजच्या शेजारी बसलेली दिसत आहे.

“त्याला केवळ २ तास…” कियारा अडवाणीने केलेला सुशांत सिंह राजपूतच्या ‘त्या’ सवयीबद्दल खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रियांकाच्या या ट्वीटवर नेटकरी कमेंट्स करून फजला श्रद्धांजली वाहत आहेत. ‘देव त्याच्या आत्म्याला शांती देवो’, ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.