बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने २०२२च्या जुलै महिन्यात प्रेमाची कबुली दिली. आयपीएले माजी चेअरमॅन व व्यावसायिक ललित मोदींना डेट करत असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळेच २०२२ वर्षात सर्वाधिक सर्च झालेल्या टॉप १० व्यक्तींच्या यादीमध्ये त्यांनी स्थान मिळवलं आहे.

गुगलकडून यंदाच्या वर्षात भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी या यादीत सुश्मिता सेनचा समावेश आहे. त्याबरोबरच ललित मोदींचं नावही या यादीत आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही या यादीत समावेश आहे.

हेही वाचा >>हार्दिकशी लग्नगाठ बांधल्यानंतर अक्षया भावूक; लग्नाची तारीख कोरलेल्या नखांचा फोटो शेअर करत म्हणली…

हेही वाचा >> ३५ लाखांचा लेहेंगा, ८५ लाखांचे दागिने अन्…; भावाच्या लग्नात उर्वशी रौतेलाची चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२२ मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्तींच्या यादीत पहिलं नाव नुपूर शर्मा यांचं आहे. तर दुसऱ्या स्थानावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर ललित मोदी व सुश्मिता सेन अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत.

२०२२ मध्ये गुगलवर सर्च करण्यात आलेल्या टॉप १० व्यक्ती

१.नुपूर शर्मा

२.द्रौपदी मुर्मू

३.ऋषी सुनक

४.ललित मोदी

५.सुश्मिता सेन

६.अंजली अरोरा

७.अब्दु रोझिक

८.एकनाथ शिंदे

९.प्रविण तांबे

१०.अंबर हर्ड

१४ जुलै २०२२ रोजी ललित मोदी यांनी सुश्मिता सेनूबरोबरचा फोटो शेअर करत त्यांच्या नात्याबद्दल कबुली दिली होती.