अभिनेत्री सुश्मिता सेनने वयाची ४५शी ओलांडली आहे. पण आजही ती बॉलिवूडमधील तरुण अभिनेत्रींना सौंदर्य व फिटनेसच्या बाबतीत टक्कर देते. योगा व नियमित व्यायाम सुश्मिता करते. आपल्या आरोग्याकडे कधीच दुर्लक्ष न करणाऱ्या अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने आपल्या आरोग्याबाबत माहिती दिली आहे.

आणखी वाचा – Video : जेव्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावचा लेक डायबिटीजचा अर्थ सांगतो तेव्हा…; व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

काही दिवसांपूर्वी सुश्मिताला हृदयविकाराचा झटका येऊन गेला. इतकंच नव्हे तर तिला होणारा त्रास पाहता सुश्मिताची अँजिओप्लास्टीही करण्यात आली. वडिलांबरोबरचा हसरा फोटो शेअर करत तिने ही माहिती दिली. सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आला हे ऐकूनच चाहते चिंतेत पडले आहेत.

सुश्मिता म्हणाली, “काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला. अँजिओप्लास्टीही झाली. आता ठिक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या हृदयरोग तज्ज्ञांनी माझं हृदय मोठं आहे याची मला खात्री पटवून दिली. यादरम्यान बऱ्याच लोकांनी मला मदत केली. या लोकांसाठी मी दुसरी पोस्ट शेअर करेन”.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीचा पुण्यामध्ये आहे ‘हा’ व्यवसाय, अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली, “अजूनही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ही पोस्ट फक्त माझ्या शुभचिंतक व जवळच्या व्यक्तींसाठी आहे. आता मी अगदी मस्त आहे ही आनंदाची बातमी मला तुम्हाला द्यायची होती. मी नवीन आयुष्यासाठी आता तयार आहे”. सुश्मिताच्या या पोस्टनंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. चाहते तू लवकर यामधून बरी हो, तुझी काळजी घे असं कमेंट करत म्हणत आहेत.