फिटनेस व उत्तम शरीरयष्टी असावी म्हणून अभिनेत्री विशेष मेहनत घेताना दिसतात. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे सुश्मिता सेन. सुश्मिता नियमित व्यायाम व योगा करते. यादरम्यानचे बरेच फोटो व व्हिडीओ ती सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसते. पण आता तिने एक पोस्ट शेअर करत सगळ्यांनाचा दुःखद धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वीच सुश्मिताला हृदयविकाराचा झटका येऊन गेला.

आणखी वाचा – ‘बिग बॉस १६’चं विजेतेपद पटकावल्यानंतर एमसी स्टॅनचं पुण्यात पहिलं कॉन्सर्ट, एका तिकिटाची किंमत आहे तब्बल…

सुश्मिताने पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या उत्तम आरोग्यासाठी सगळेच जण प्रार्थना करत आहेत. बऱ्याच सेलिब्रिटी मंडळींनी सुश्मितासाठी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे खास पोस्ट शेअर केली आहे, शिवाय तिला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला चाहते देत आहेत. अशातच सुश्मिताच्या भावाने बहिणीसाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीचा पुण्यामध्ये आहे ‘हा’ व्यवसाय, अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली, “अजूनही…”

भाऊ राजीव सेन याने सुश्मिताबरोबर फोटो शेअर केला. तो म्हणला, “माझी खंबीर बहीण. भाऊ तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो”. बहिणीवरचं प्रेम राजीवने यावेळी व्यक्त केलं. सुश्मिताची प्रकृती आता स्थिर आहे. तिने या कठीण प्रसंगांमध्ये तिला मदत करणाऱ्या सगळ्यांचेच आभार मानले आहेत.

आणखी वाचा – सई ताम्हणकरच्या अफेअरच्या चर्चा, ‘त्या’ व्यक्तीबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाली, “मला तुझी…”

सुश्मिताने तिच्या वडिलांबरोबरचा फोटो शेअर करत ही माहिती दिली. सध्या ती ठिक आहे. पण हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. शिवाय तिची अँजिओप्लास्टीही करण्यात आली. सुश्मिताने सांगितलेली ही माहिती वाचून सगळ्यांनाच आश्चर्चाचा धक्का बसला आहे.