बॉलिवूड अभिनेत हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान सध्या टीव्ही अभिनेता अली गोनी भाऊ अर्सलान गोनीला डेट करत आहे. हृतिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सुझान खान अर्सलानबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकदा ती त्याच्याबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आताही अर्सलानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुझानने खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ज्यावर हृतिक रोशनने केलेल्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

अर्सलान गोनीचा आज ३६ वा वाढदिवस आहे. या खास दिवशी सुझानने त्याच्याबरोबर काढलेले फोटो व्हिडीओच्या स्वरुपात शेअर केले आहेत. याच बरोबर तिने या व्हिडीओला खास कॅप्शनही दिलं आहे. सुझान खानने लिहिलं, “माझं प्रेम, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा! मला माहीत आहे तू खूपच अविश्वसनीय व्यक्ती आहेस. मी एक चांगली व्यक्ती व्हावं यासाठी तू नेहमीच प्रयत्न करतोस. तू माझ्या प्रेमाची व्याख्या आहेस. अगदी आतापासून ते अखेरपर्यंत. अगदी त्याही पुढे आपण आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करणार आहोत.” या पोस्टसह तिने त्यांच्या नावाचा हॅशटॅगही वापरला आहे.

आणखी वाचा- “तुमच्यापेक्षा दाक्षिणात्य स्टार्स….” चाहत्याला ढकलल्यामुळे हृतिकवर चाहते संतापले; व्हिडीओ व्हायरल

सुझान खानच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटींनीही कमेंट्स केल्या आहेत. ज्यात सोनाली बेंद्रे, माहीप कपूर, नीलम कोठारी, संजय कपूर, संजय दत्त, सोनल चौहान यांचा समावेश आहे. या सर्वांनीच अर्सलानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या सगळ्यात अभिनेता आणि सुझानचा पूर्वाश्रमीचा पती हृतिक रोशनच्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हृतिकने “वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्सलान गोनी” अशी कमेंट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा- सबा आझादच्या ‘त्या’ पोस्टवर हृतिकच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने केली कमेंट; म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काही युजर्सनी या पोस्टवरून सुझान खानला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिलं, “हृतिक रोशनपासून २ मुलं असतानाही आज हा माणूस हिच्यासाठी अविश्वसनीय ठरत आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलं, “काही वर्षांपूर्वीच हृतिक खास होता.” तर आणखी एका युजरने लिहिलं, “असं तर ती आधी हृतिकबद्दलही बोलली होती तर मग कधी कोणा तिसऱ्या व्यक्तीलाही ती हे बोलू शकते.” अर्थात घटस्फोटानंतर हृतिक रोशनही त्याच्या आयुष्यात पुढे गेला असून तो आता मॉडेल सबा आझादला डेट करत आहे.