बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करचा आज ३५ वा वाढदिवस आहे. स्वरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. स्वरा तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या वक्तव्यांमुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी चर्चेत राहते. अनेकदा स्वराला यासाठी ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. एकदा दारूच्या नशेत स्वरा भास्करने शाहरुख खानला खूप त्रास दिला होता. एका मुलाखतीत खुद्द स्वराने तो किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा- अमिताभ बच्चन यांना ठीक होण्यास लागणार इतका कालावधी, प्रकृतीबद्दल नवीन अपडेट समोर

स्वराने सांगितले, मी क्रॉप टॉप घालून वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. त्या वेळेस मी बारीक होते. त्या पार्टीत शाहरुख खानही उपस्थित होता. मी पार्टीत शाहरुख खानला खूप चिडवले. पण किंग खान ते सहन करत राहिला. मी त्याला खूप त्रास दिला, तरीही तो काहीच बोलला नाही. शाहरुखच्या या प्रतिक्रियेने ती खूप प्रभावित झाल्याचे स्वराने सांगितले. एकदा ती एका पार्टीत इतकी मद्यधुंद झाली की, तिने सर्वांसमोर शाहरुख खानसोबत फ्लर्ट करायला सुरुवात केली होती.

हेही वाचा- ‘बॉलीवूडने मला एकटे पाडले होते’

स्वरा भास्करचा जन्म ९ एप्रिल १९८८ रोजी दिल्लीत लष्करी कुटुंबात झाला. स्वराचे वडील भारतीय नौदलात एक अधिकारी आहेत. तर आई दिल्लीच्या जेएनयू महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. स्वरा आलिशान पद्धतीचे आयुष्य जगते. स्वराच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे सुमारे पाच दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे ४० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

हेही वाचा- निवडणूक आयोगाकडून ३९ लाखांची चांदीची भांडी जप्त; निर्माते बोनी कपूर यांच्याशी नेमकं कनेक्शन काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वरा एका चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी रुपये मानधन घेते. स्वराच्‍या लाइफ स्‍टाईलबद्दल बोलायचे झाले तर स्वराची दिल्ली आणि मुंबईत घरे आहेत. स्वरा भास्करला महागड्या वाहनांची आवड आहे. BMW X1 ही स्वराची आवडती कार आहे. या कारची किंमत सुमारे ४८ लाख रुपये आहे.