अभिनेत्री स्वरा भास्करने प्रियकर फहाद अहमदशी रजिस्टर मॅरेज केलं आहे. त्यानंतर तिने १६ फेब्रुवारी रोजी फहादबरोबर साखरपुडा केला. तिच्या आणि फहादच्या लग्नाची बातमी समोर येताच तिला तिच्या एका जुन्या ट्वीटवरून खूप ट्रोल करण्यात आलं होतं. त्या ट्रोलिंगला फहादने उत्तर दिलं आहे.

स्वरा भास्करने काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केलं होतं. ज्या ट्वीटमध्ये तिने पती फहादला भाऊ असं म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. स्वराचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये “जन्मदिनाच्या शुभेच्छा फहाद मिया. भाईचा आत्मविश्वास असाच कायम राहो. आनंदी राहा आणि असंच काम करत राहा. आता वय वाढत चाललंय, लग्न कर. तुझा वाढदिवस आणि हे संपूर्ण वर्ष तुझ्यासाठी चांगलं जाओ मित्रा,” असं लिहिलं होतं. त्यावरून त्यांना ट्रोल केलं गेलं होतं, त्याला फहादने उत्तर दिलंय.

“चला किमान संघी लोकांनी हे तर मान्य केलं की हिंदू व मुस्लीम भाऊ-बहीण असू शकतात. आता पती-पत्नी देखील विनोद करू शकतात, हेही मान्य करून घ्या,” असं फहाद अहमदने ट्वीट करत म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, स्वरा व फहाद यांची भेट सीएएविरोधातील आंदोलनात झाली होती. मित्र झाल्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांनी जानेवारी महिन्यात नोंदणी पद्धतीने लग्न केलं आणि मार्च महिन्यात ते सर्वांच्या उपस्थितीत सोहळा आयोजित करून लग्न करणार आहेत.