गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये मैत्रीवर आधारित अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तर आता याच धाटणीचा आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘धक धक.’ चार महिलांच्या मैत्रीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री तापसी पन्नू हिने केली आहे.

काही महिन्यांपूर्वी तापसी पन्नूने या चित्रपटाची घोषणा केली. तेव्हापासूनच या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते. या चित्रपटात रत्ना पाठक-शाह, दीया मिर्झा, फातिमा सना शेख आणि संजना सांघी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर आज या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

आणखी वाचा : ‘फुकरे ३’ने केला १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश! ‘इतकी’ कमाई करत काल शाहरुख खानच्या ‘जवान’लाही टाकलं मागे

या ट्रेलरमध्ये रत्ना पाठक-शाह, दीया मिर्झा, फातिमा सना शेख आणि संजना सांघी या चौघीजणी बाईक रायडर निघाल्या असल्याचं दिसतं. त्यांना बाईकवरून १८ हजार फूट उंची गाठायची असते. पण त्यांचा हा प्रवास अजिबात सोपा नसतो. या प्रवासात त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. अशा सगळ्यांमधून त्या त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचणार की नाही हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : Video: ‘मेरा पिया घर आया’ गाण्याचं येणार 2.0 व्हर्जन, सनी लिओनी दिसणार बोल्ड अंदाजात, प्रतिक्रिया देत माधुरी दीक्षित म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘धक धक’चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित होताच प्रेक्षकांकडून त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर अनेकांनी यावर कमेंट करत “हा ट्रेलर पाहून ‘झिंदगी ना मिलेगी दोबारा’ची आठवण आली,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. हा ट्रेलर सर्वांना चांगलाच आवडला आहे त्यामुळे आता सर्वांचं लक्ष या चित्रपटाकडे लागलं आहे. १३ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.