‘तारे जमीन पर’ या चित्रपटातील इशान अवस्थी अर्थात दर्शिल सफारी हा गोंडस मुलगा सगळ्यांनाच आठवत असेल. दर्शिलच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. त्याने आमीर खानसारख्या नटाबरोबर केलेलं काम प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडलं होतं. हाच दर्शिल काही दिवसांपूर्वी चांगलाच चर्चेत होता. त्याचा इंस्टाग्रामवरील डॅशिंग लूक पाहून लोकांचा विश्वासच बसत नव्हता.

दर्शिल सफारी आता पुन्हा अशाच एका कारणामुळे चर्चेत आहे. दर्शिल आणि आमिर खान यांचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. खुद्द दर्शिलने हा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये १६ वर्षांपूर्वीचा ‘तारे जमीन पर’मधील आमिर आणि दर्शिल यांचा एक फोटो आणि आत्ताचा या दोघांचा एक वेगळा लूक असा एकत्रितरित्या शेअर करण्यात आला आहे.

आणखी वाचा : “ते माफीवीर…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचदरम्यान रणदीप हुड्डा स्पष्टच बोलला

१६ वर्षांनी रीयुनियन झाल्याचा हा फोटो दर्शिलने शेअर केला आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा होताना दिसत आहे. ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाच्या चाहत्यांना ही पोस्ट चांगलीच आवडली आहे. या फोटोमध्ये आमिर एका म्हाताऱ्या व्यक्तीच्या रूपात दिसत आहे. चाहत्यांनी कॉमेंट करत दर्शिलला पुन्हा आमिरबरोबर स्क्रीन शेअर करण्याची विनंती केली आहे. चाहत्यांना या दोघांची ही जोडी प्रचंड आवडली असून त्यांना पुन्हा एकदा एकत्र काम करण्याची विनंतीही केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Darsheel Safary (@dsafary)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमिर खान लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात आमिरबरोबर दर्शिलही दिसू शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. अद्याप या दोघांनी याविषयी अधिकृत भाष्य करायचं टाळलं असलं तरी चाहत्यांच्या कॉमेंटमुळे या चर्चेला उधाण आलं आहे. ‘लाल सिंह चड्ढा’नंतर आमिरने अभिनयातून ब्रेक घेतला होता आता तो पुन्हा ‘सितारे जमीन पर’मधून कमबॅक करणार आहे.